Covid-19 in India : जगभरात अजुनही कोरोनाचा (Corona) हाहाकार सुरुच आहे. देशात प्रादुर्भावात घट झालेली असली तरी धोका मात्र अद्याप टळलेला नाही. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या (Coronavirus Updates) 7,946 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही आकडेवारी काल (बुधवार) पेक्षा जास्त आहे. बुधवारी देशात 7231 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 45 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये आणखी घट झाली आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या  (Corona Active Cases) आता 62,748 वर आली आहे. यापूर्वी बुधवारी, सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली होती. बुधवारी ही संख्या 64,667 वर पोहोचली होती. गेल्या 24 तासांत 9 हजार 828 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, डेली पॉजिटिविटी रेट 2.98 टक्क्यांवर पोहोचला आहे. 


राज्याचा रिकव्हरी रेट 98.04 टक्क्यांवर 


राज्यात आज 1600 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1864 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,41, 458 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण 98.04 टक्के इतकं झालं आहे. 


मुंबईत बुधवारी 638 रुग्णांची नोंद


मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मुंबईसह महाराष्ट्रात कमी होताना दिसत आहे. आज मुंबईत 638 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र दिसत आहे. 


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत बुधवारी 789 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,20,868 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.9 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,698 झाली आहे. सध्या मुंबईत 4,257 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 638 रुग्णांमध्ये 594 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 1260 दिवसांवर गेला आ