India Coronavirus Updates : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 21 हजार 257 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 271 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल (गुरुवारी) देशात 22 हजार 431 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
आतापर्यंत 4 लाख 50 हजार 127 रुग्णांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन 2 लाख 40 हजार 221 वर पोहोचली आहे. जो 205 दिवसांतील सर्वात कमी आकडा आहे. आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 50 हजार 127 लोकांचा मृत्यू झाला आहे.
काल (गुरुवारी) लसीचे 50 लाखांहून अधिक डोस
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात काल (गुरुवारी) कोरोना लसीच्या 50 लाख 17 हजार 753 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर लसीकरणाचा आकडा वाढून आता 93 कोटी 17 लाख 17 हजार 191 वर पोहोचला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) नं सांगितलेल्या माहितीनुसार, भारतात काल कोरोना व्हायरसच्या 13 लाख 85 हजार 706 चाचण्या करण्यात आल्या.
राज्यात काल नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2,681 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 413 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 94 हजार 075 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे.
राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 818 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (15), नंदूरबार (1), धुळे (3), जालना (42), परभणी (89), हिंगोली (16), नांदेड (09), अकोला (25), वाशिम (05), बुलढाणा (05), नागपूर (91), यवतमाळ (04), वर्धा (6), भंडारा (1), गोंदिया (2), गडचिरोली (11 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 33 हजार 397 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,39,587 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,328 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 97,66, 957 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 458 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 458 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 185 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,821 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4784 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1118 दिवसांवर गेला आहे.