मुंबई ज्येष्ठ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी आपल्या वक्तव्यामुळे अनेकदा त्यांच्याच पक्षाला अडचणीत आणलंय. त्याचा प्रत्यय मंगळवारी पुन्हा आला. अमेरिकेत आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला, तर मुलांना 100 टक्के संपत्ती वारसाहक्कात मिळत नाही, कारण संपत्तीचा 55 टक्के भाग सरकार कर म्हणून घेतं, मला हा कायदा योग्य वाटतो, पण भारतात तसं काहीच नाहीये.. यावर चर्चा झाली पाहिजे.. कारण संपत्तीचं पुनर्वाटप करायचं असेल तर लोकहितार्थ नवे कायदे करावे लागतील असं पित्रोदा म्हणाले. यावरून भाजपनं (Congress)   काँग्रेसवर सडकून टीका सुरू केली आहे.


सॅम पित्रोदा म्हणाले,  अमेरिकेत वारसा हक्काने म्हणजे वडिलोपार्जीत मिळालेल्या संपत्तीवर कर आहे.  आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर  मुलांना त्यांची 100 टक्के संपत्ती मिळत नाही.  त्य संपत्तीतील 45 टक्के भाग मुलांना मिळतो तर 55 टक्के भाग हा  कर म्हणून सरकार घेते.   हा एक चांगला  कायदा आहे. त्यांच्या कायद्यात असे म्हटले आहे की, जर तुम्ही तुमच्या कारकिर्दीत संपत्ती निर्माण केली आणि आता ती तुम्ही वारसा हक्काने तुमच्या पुढच्या पिढीला द्या पण त्यातील काही भाग हा  लोकहितार्थ दिल पाहिजे. जो कायदा मला योग्य वाटतो.  म भारतात असे होत नाही, असे ते म्हणाले.


संपत्तीचं पुनर्वाटप करायचं असेल तर लोकहितार्थ नवे कायदे करावे लागतील : सॅम पित्रोदा  


भारतात जर  एखाद्याची संपत्ती 10 अब्ज रुपये असेल आणि त्या व्यक्तीच्या मरणोत्तर  तर त्याच्या मुलांना 10 अब्ज रुपये मिळतात.  जनतेला काहीच मिळत नाही. त्यामुळे हे असे मुद्दे आहेत ज्यांवर लोकांनी चर्चा केला पाहिजे.  शेवटी काय निष्कर्ष निघेल हे माहित नाही पण जेव्हा आपण संपत्तीच्या पुनर्वितरणाबद्दल बोलतो तेव्हा आपण नवीन धोरणे आणि नवीन कार्यक्रमांबद्दल बोलत असतो.  जी धोरणे श्रीमंतांच्या हिताची नसून लोकांच्या हिताची असतात.






पित्रोदा यांची भूमिका वैयक्तिक :  जयराम रमेश 


काँग्रेसनं मात्र पित्रोदा यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं म्हटलंय. पित्रोदा जे म्हणाले, ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, ती काँग्रेस पक्षाची भूमिका नाही असं काँग्रेसनं म्हटलंय. जयराम रमेश यांनी तसं ट्विट देखील केलं आहे. जयराम रमेश म्हणाले,  सॅम पित्रोदा हे माझ्यासह अनेकांचे गुरू राहिलेले आहेत. पित्रोदा हे त्यांची मतं मोकळेपणानं व्यक्त करत असतात. पण त्यांच्या प्रत्येक मताशी काँग्रेस सहमत असेलच असं नाही.. त्यांच्या विधानांची चिरफाड करून त्याचा विपर्यास करणे.. हा मोदींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे. 


हे ही वाचा :


Indira Gandhi Donates Her Jewellery : भारत-चीन युद्धात देश संकटात आला; इंदिरा गांधींनी अंगावरील सोन्याचे दागिने राष्ट्रीय संरक्षण निधीला केले दान