राम मंदिर ही कोणचीही एकाची प्रॉपर्टी नाहीय, तर हे मंदिर देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आहे. या मंदिर निर्माणात शिवसेना सहभागी होणार असून त्याचबरोबर इतरांनी हातभार लावण्याचं आवाहन संजय राऊत यांनी केलं.
कसा असणार उद्धव ठाकरेंचा दौरा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत दुपारच्या दरम्यान दाखल होतील त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आधीच अयोध्येत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद होईल, त्यानंतर साडेचार वाजता ते रामलल्लाचे दर्शन घेतील. पर्यावर मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, कॅबिनेटमधील काही मंत्री आणि शिवसेनेचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
...तर हिंदूत्वाची व्याख्या बदलावी लागेल; संजय राऊत यांचा हिंदू महासभेला टोला
अयोध्या दौऱ्यावर कोरोनाचं सावट
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शरयू तीरावराचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या हिरमोड झाला आहे. नियोजित दौऱ्यानुसार उद्धव ठाकरे हे शरयू तीरावर आरती करणार होते. पण उत्तर प्रदेश सरकारचा जास्त गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे मुंबईला रवाना होतील.
अयोध्येत शिवसैनिकांची गर्दी आणि जोरदार होर्डिगबाजी
अयोध्येत उद्धव ठाकरे प्रभू रामचंद्राच्या दर्शनसाठी येत असल्यामुळे अयोध्यानगरीत शिवसेनेचं जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळतंय. अयोध्येच्या प्रत्येक चौकाचौकात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. लखनऊ विमानतळापासून ते अयोध्यानगरीपर्यंत शिवसेनेचे होर्डिंग पाहायला मिळतायत. महाराष्ट्रात विविध भागासह दिल्ली उत्तर प्रदेशातले शिवसैनिक मोठ्या प्रमाणात अयोध्येत दाखल झाले आहेत. मुंबईहून आलेल्या शिवसैनिकांचं अयोध्यामध्ये ढोल ताशा आणि फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आलं.
Sanjay Raut | चलो अयोद्धा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला रामलालाचं दर्शन घेणार | ABP Majha