Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo News) माध्यमातून देशभरातील विविध भागांना भेटी देत आहेत. काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेत अनेक लोक सभागी होता आहे. काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या प्रवास आणि फूड चॅनल कर्लिटेल्ससोबतच्या मजेदार संभाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधींनी त्यांचा डाएट, वर्कआउट, आवडती डिश आणि लग्नाविषयी सांगितले आहे. यात त्यांनी जीवनसाथी कसा हवा याबाबत देखील सांगितले आहे.
"दाढी काढण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर खूप दबाव येत असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच लग्नाच्या प्लॅनवर राहुल गांधी म्हणाले, मी लग्नाच्या विरोधात नाही. माझ्या आई-वडिलांचं लग्न झालं होतं ते खूप सुंदर नातं होतं. माझ्यासाठी कोणतीही चेकलिस्ट नाही तर फक्त एक प्रेमळ आणि बुद्धिमान जीवनसाथी असावा, असं ते म्हणाले.
Rahul Gandhi : राहुल गांधींचा आहार काय आहे?
राहुल गांधी यांनी यावेळी त्यांच्या आहाराबाबत देखील सांगितले. "मी नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात शारीरिक हालचाली करत असतो. मार्शल आर्ट्सशिवाय मला डायव्हिंगही अवगत आहे. सध्याच्या भारत जौडो यात्रेत देखील मी नियमितपणे मार्शल आर्टचे वर्ग घेत असतो. मी कार्बोहायड्रेट टाळतो, पण भात किंवा रोटी खावी लागली तर मी रोटीला प्राधान्य देतो. मांसाहारी म्हणून आवडता पदार्थ म्हणजे चिकन टिक्का, सीख कबाब आणि एक ऑम्लेट.
Rahul Gandhi : राहुल गांधींचे जेवणासाठी कोणते ठिकाण आवडते?
राहुल गांधी यांनी जेवणासाठी त्यांचे आवडते ठिकाण देखील सांगितले आहे. राहुल गांधी यांचे जेवणासाठीचे आवडते ठिकाण जुनी दिल्ली आहे. मोती महल, सागर, स्वागत, सरवण भवन ही त्यांची आवडती रेस्टॉरंट्स आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी या संभाषणात त्यांच्याबाबतच्या अनेक गोष्टींवर मनमोकळा संवाध साधला आहे. यातून त्यांच्या डेली रुटिनबाबतही सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
Pune MNS Samir Thigale : धक्कादायक! पुण्यात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार; कुटुंबीयांसमोरच घडला थरार