Haryana News:  काँग्रसेचे (Congress) नेते दिपक सिंह हुड्डा (Dependra Singh Huddha) यांनी 'ऑपरेशन लोटस'विषयी एक खळबळजनक विधान केलं आहे. दीपक हुड्डा यांनी म्हटलं की, 'हरियाणामध्ये ऑपरेशन लोटसचा उलट प्रवास सुरु आहे.' काही महिन्यांपूर्वी भाजपच्या 29 माजी आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. 


दीपेंद्र सिंह हुड्डा यांचं भाजपवर टीकास्त्र 


दीपेंद्र सिंह हु्ड्डा यांनी भाजपविषयी बोलतांना म्हटलं की, 'भाजपने हरियाणामध्ये आपली जागा गमवण्यास सुरुवात केली आहे.' कारण गेल्या काही महिन्यांमध्ये हरियाणामधील 29 माजी आमदारांनी भाजपसोडून काँग्रेसचा हात धरला आहे, असं म्हणत दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच त्यांनी यावेळी ऑपरेशन लोटसचा उलट प्रवास सरु असल्याचा दावा देखील केला आहे. 






ऑपरेशन लोटस नेमकं काय?


ऑपरेशन लोटस हा काही वर्षांपूर्वी काँग्रेस आणि जनता दल यांच्याकडून रुढ करण्यात आला आहे. स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयशी ठरलेला भाजप पक्ष हा ऑपरेशन लोटस चालवत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्षातील आमदारांना फोडून आपल्या पक्षात सामील करुन सत्ता स्थापनेचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचा दावा देखील विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.  


मध्य प्रदेशातील घटनेवर दिपेंद्र हुड्डा यांची संतप्त प्रतिक्रिया


दिपेंद्र सिंह हुड्डा यांनी मध्ये प्रदेशातील आदिवासी व्यक्तीवर लघुशंका केल्याच्या व्हायरल व्हिडिओसंदर्भात बोलतांना दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी म्हटलं की, 'भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सत्तेचा माज आला आहे. त्यांना समाजातील वंचित घटकांसोबत अशा पद्धतीची वागणूक करताना काहीच वाटत नाही.' दरम्यान यावेळी बोलतांना त्यांनी मध्यप्रदेशातील घडलेल्या या घटनेचा निषेध केला असून यावर नाराजी व्यक्त केली आहे.  तसेच त्यांनी आरोपीवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 


दिपेंद्र हुड्डा यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 


हे ही वाचा :