दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीत विरोधकांनी दिल्लीच्या रामलीला मैदानात (Ramlila Maidan) 'लोकशाही वाचवा' रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये इंडिया आघाडीतील (INDIA Alliance) महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या सभेमध्ये विरोधी नेत्यांनी आपल्या भाषणादरम्यान सत्ताधारी भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर सडकून टीका केली. दरम्यान, काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनीदेखील जोरदार भाषण केले. मात्र त्यांच्या भाषणाची एक क्लीप सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा संदर्भ देताना चुकून खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव घेतले.
भाजपच्या रणनीतीवर बोट ठेवलं
इंडिया आघाडीने आयोजित केलेल्या या रॅलीला हजारो लोक उपस्थित होते. यावेळी खरगे यांनी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी नरेंद्र मोदी तसेच भाजपच्या रणनीतीवर बोट ठेवले. मात्र राजीव गांधी यांच्या कामाचा, त्यांनी दिलेल्या बलिदानाच संदर्भ देताना त्यांनी चुकून राहुल गांधी यांचा उल्लेख केला.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
आपल्या भाषणात "या देशासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वत:चे प्राण दिले. राहुल गांधी (त्यांना राजीव गांधी असे म्हणायचे होते) यांनीही आपले प्राण दिले. त्यांच्या देहाचे तुकडे-तुकडे झाले. इंदिरा गांधींनी तर देशाला एकसंध ठेवण्यासाठी तब्बल 32 गोळ्या अंगावर झेलल्या," असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. तसेच देशासाठी प्राण देणारा दुसरा कोणी नेता असू शकतो का? असा सवालही त्यांनी केला.
सत्तेत राहण्यासाठी सर्वकाही केलं जातंय
दरम्यान, या सभेत राहुल गांधी यांनीदेखील रोखठोक भाषण केले. मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी क्रिकेटच्या सामन्यांचे उदाहरण दिले. विरोधकांनी निवडणूकच लढू नये असे मोदी यांना वाटत आहे. मोदी यांनी निवडणूक आयोगावर त्यांचेच लोक बसवले आहेत. त्यांनी दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं आहे. काँग्रेसची बँक खाती बंद करण्यात आली आहेत. न्यायपालिकेवर दाबव टाकला जात आहे, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच संविधान रद्द करण्यासाठी आणि नरेंद्र मोदी सत्तेत कायम राहावेत यासाठी हे सगळं केलं जात आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.
हे ही वाचा >