एक्स्प्लोर

पंतप्रधानांनी शिक्षणमंत्र्यांना तात्काळ बडतर्फ करावं, अरविंद केजरीवालांची मागणी, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिला पाठिंबा

आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Cockroach Janta Party Protest :  आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अशी आंदोलने तरुणांमधील प्रचंड संताप आणि निराशा दर्शवतात. यावेळी केजरीवालांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. मोदी सरकारने तरुणांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत असे केजरीवाल म्हणाले. 

मोदी सरकारने तरुणांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत

अरविंद केजरीवाल म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन हे देशातील तरुणांच्या प्रचंड संताप आणि निराशेची अभिव्यक्ती आहे. त्यांना देशद्रोही ठरवण्याऐवजी मोदी सरकारने त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. आम आदमी पार्टी त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देते. पंतप्रधानांनी शिक्षणमंत्र्यांना तात्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी केजरीवाल यांनी केली. जंतर मंतरवर अभिजीत दीपके यांच्यासोबत मोठ्या संख्येने तरुण जमले होते. कॉकरोच जनता पक्षाच्या (सीजेपी) संभाव्य निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ( 6 जून) दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. या संघटनेचे संस्थापक, अभिजीत दीपके, यांनी या निदर्शनात सहभाग घेतला. जंतर मंतरवर मोठ्या संख्येने लोक, ज्यात बहुतांशी तरुण होते, जमले होते. त्यांच्यापैकी अनेकांनी झुरळांचे मुखवटे घातले होते आणि हातात फुले धरली होती.

शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आंदोलनकर्त्या तरुणांची मागणी 

शालेय विद्यार्थी आपल्या पालकांसोबत या आंदोलनात सामील झाले. सहभागींमध्ये बहुतांश शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तरुण व्यावसायिक होते. या निदर्शनाच्या माध्यमातून, सीजेपीने राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET), सीबीएसई बोर्ड परीक्षा, कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET) आणि कर्मचारी निवड आयोग (SSC) यांसारख्या विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबद्दल जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली.

कोट्यवधी फॉलोअर्स बनवणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचे आज पहिल्यांदाच रस्त्यावर उतरुन आंदोलन

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आज पहिल्यांदाच सोशल मीडियातून कोट्यवधी फॉलोअर्स बनवणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचे आज पहिल्यांदाच रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. दिल्लीतील जंतरमंतरवर मोठ्या प्रमाणात तरुणाई शासनाविरुद्ध घोषणाबाजी करत एकत्र जमली होती. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी अमेरिकेतून आज दिल्लीत आगमन करताच आंदोलन करत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विमानतळातून बाहेर येतानाच हाती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्राचे पुस्तक घेऊन अभिजीत दीपकेंनी आंदोलनात सहभाग घेतला. त्यावेळी, मोठ्या संख्येने तरुणाई त्यांच्या स्वागताला हजर होते. 

 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election : भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget