मुंबई : सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या सुनावणीतील एका टिप्पणीचा आधार घेत अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली होती. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्सवर कॉकरोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया हँडल्सला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. यानंतर अभिजीत दिपके भारतात आले आणि महिनाभराच्या आंदोलनानंतर सीजेपीच्या पुढाकारानं सुरु झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि नीट पेपरफुटीच्या मुद्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला. अभिजीत दिपके यांनी त्यानंतर सीजेपी दबाव गट म्हणून कार्य करेल, असं जाहीर केलं होतं. दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपकेच्या घरी सीजेपीची बैठक सुरु होती. अभिजीत दिपके यांनी क्या बोलती पब्लिक हा कार्यक्रम जाहीर केला असून तो सप्टेंबर महिन्यात राबवण्यात येणार आहे. सीजेपीकडून आज राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. सीजेपीचे संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक पद अभिजीत दिपके यांच्याकडे असेल.
कॉकरोच जनता पार्टीची कार्यकारिणी
संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक : अभिजीत दिपके
सह संयोजक : आशुतोष रांका, सौरव दास
राष्ट्रीय संघटना प्रभारी :अजिंक्य शिंदे संघटना सह प्रभारी : दीपक बलियानराष्ट्रीय सचिव : अफ्रीन नवाजमीडिया प्रमुख : विजय रेड्ड मलंगीकायदेविषयक घडामोडी प्रमुख : रत्ना सिंग रिसर्च अँड पॉलिसी लीड : वैष्णवी गौरटेक्नोलॉजी लीड : रोहन देशपांडेफायनान्स लीड : योगेश इंगळे
विभागीय प्रमुख
उत्तर विभाग : दीपक बलियानदक्षिण विभाग : विजय रेड्डी मलंगीपूर्व आणि ईशान विभाग : अंकित भारद्वाजपश्चिम विभाग : योगेश इंगळे
दरम्यान, सीजेपीनं पुढील सहा महिन्यांमध्ये राज्य समन्वय समित्या आणि लोकसभा आणि शहर पातळीवर समन्वय समित्या स्थापन करण्याचं नियोजन केलं आहे. वरील नावांशिवाय आज दुसऱ्या कोणाचेही नाव पदाधिकारी म्हणून जाहीर करण्यात आलं नाही, असं सीजेपीनं म्हटलंय.
आंदोलनामुळं लोकांची भीती संपली
अभिजीत दिपके यांनी सीजेपीच्या सहकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की जे सरकार बोलत होतं या सरकारमध्ये राजीनामा होत नाही. जेन झीने त्यांना झुकवलं. या आंदोलनाने ज्या सरकारला लोक इतकी वर्षे घाबरून होती, त्यांची भीती गेली. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा सर्वात मोठा विजय नाही, लोकांच्या मनातील भीती संपली, हे मोठं यश आहे.नागरीक सरकारला प्रश्न विचारतील, वेळ पडल्यास रस्त्यावर येतील, असं अभिजीत दिपके म्हणाले.
कॉकरोच जनता पार्टी सप्टेंबर महिन्यात एक देशव्यापी क्या बोलती पब्लिक... हे कॅम्पेन राबवणार आहे., आम्ही देशभरात दौरा करुन जनतेच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घेणार आहोत, असं दिपके म्हणाले.
