एक्स्प्लोर

राष्ट्रहिताचं काम डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल; गोव्यातील अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे प्रतिपादन

संघटनेचे संस्थापक राजा माने यांच्या नेतृत्वात यापूर्वी महाबळेश्वर येथील पुस्तकाचे गाव असलेल्या भिलार येथे पहिले अधिवेशन, तर कोल्हापूरच्या कन्हेरी मठात दुसरे अधिवेशन घेण्यात आले होते

पणजी: देशाला 'विकसित भारत' बनवण्याचे स्वप्न केवळ सरकारी योजनांनी नव्हे, तर सत्याची साथ देणाऱ्या डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल. माहितीच्या महापुरात वाहून न जाता डिजिटल मीडियाने नितिमत्ता आणि कर्तव्यभावनेची सांगड घालून राष्ट्र उभारणीत सक्रिय सहभागी व्हावे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod sawant) यांनी केले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने पणजी येथील कला अकादमीत आयोजित तिसऱ्या 'राष्ट्रीय महाअधिवेशनाचे' उद्घाटन डॉ. सावंत यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ सावंत म्हणाले की, बातमी केवळ व्हायरल करण्यासाठी न देता त्यामागे सखोल संशोधन असावे. तुमची बातमी इतिहासाला साक्षी ठेवून भविष्याचा वेध घेणारी असायला हवी. तसेच, डिजिटल मीडिया संपादकांच्या विविध मागण्यांचे पत्र आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

संघटनेचे संस्थापक राजा माने यांच्या नेतृत्वात यापूर्वी महाबळेश्वर येथील पुस्तकाचे गाव असलेल्या भिलार येथे पहिले अधिवेशन, तर कोल्हापूरच्या कन्हेरी मठात दुसरे अधिवेशन घेण्यात आले होते. त्यानंतर, डिजिटल मिडिया पत्रकार-संपादक संघटनेचे तिसरे आणि राष्ट्रीय अधिवेशन यंदा गोव्याची राजधानी पणजी येथे पार पडले. त्यासाठी, महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यातून पत्रकार बांधव तेथे पोहोचले होते, यासह गुजरात, तेलंगणा राज्यातीलही पत्रकार आले होते. येथील अधिवेशनात राजा माने यांनीही, संघटनेच्या स्थापनेचा उद्देश आणि गेल्या 4 वर्षातील वाटचाल सांगितली. तसेच, डिजिटल मीडियातील पत्रकारांचे प्रश्न आणि अडचणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवाव्यात अशी मागणी त्यांनी केली. त्यावर, मुख्यमंत्री यांनीही नक्कीच पंतप्रधानांना पत्र लिहणार असल्याचे आश्वासन दिले. 

उदय सामंतांच्या मुलाखतीतून उलगडलं राजकारण

अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात आयोजित परिसंवादात'पत्रकारितेचे बदलते टप्पे आणि आव्हाने' या विषयावर 'कोकणसाद'चे संपादक संचालक संजय ढवळीकर यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय ॲड. संदीप कायदे, ॲड. नकुल पार्सेकर, सौमित्र देसाई यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. त्यानंतर महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी प्रकट मुलाखत घेतली. या सोहळ्याला समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आयुष्मान भारत योजनेचे डॉ. ओमप्रकाश शेटे, खासदार सदानंद तानावडे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, रामकृष्ण वेताळ, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक विकास भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर आभार सागर चव्हाण यांनी मानले.

विविध क्षेत्रात सामाजिक कार्य, राष्ट्रीय गौरव पुरस्कार

दरम्यान, या अधिवेशनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2026' देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने निलेश सांबरे (ग्रामसेवा), डॉ. महुवा साहा (शास्त्रज्ञ), कमलाकांत तारी (गोवंश संवर्धन), गुरुप्रसाद पावसकर (आयुक्त, दिव्यांग संचालनालय), विकास देशमुख (आरोग्य सेवा), चित्रा क्षीरसागर (साहित्यिक), ग्रामविकास संस्था नागझरी, सातारा (जलसंधारण - संस्थात्मक पुरस्कार) यांसह कमलेश बांदेकर, दीपक नार्वेकर, नेहा आंग्रे गांवस, प्रकाश कुलकर्णी, माणिक शेडगे, प्रा. विशाल गरड, राधा खताळ, गोवर्धन दराडे, संतोष ठोंबरे, पोश गुप्ता, राजेंद्र अग्रवाल, आणि राजेंद्र पाठक यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा

Gokul : गोकुळच्या राजकारणात नवा ट्विस्ट, 90 दिवसात निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VD Satheesan Net Worth : केरळमचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांची संपत्ती किती? नव्या मुख्यमंत्र्यांवर किती कर्ज
केरळमचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांची संपत्ती किती? नव्या मुख्यमंत्र्यांवर किती कर्ज
मोठी बातमी! आता सोन्याच्या खरेदीवर मर्यादा, सरकारनं घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन नियमासंदर्भात माहिती
मोठी बातमी! आता सोन्याच्या खरेदीवर मर्यादा, सरकारनं घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन नियमासंदर्भात माहिती
Inflation : महागाईचा भडका अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; पिकवणाऱ्याला भाव नाही, ग्राहकांना परवडत नाही
महागाईचा भडका अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; पिकवणाऱ्याला भाव नाही, ग्राहकांना परवडत नाही
बीडमध्ये बस प्रवासात महिलेच्या जवळील 15 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला; महिलेचा आक्राोश, पोलिसांकडून तपास सुरु
बीडमध्ये बस प्रवासात महिलेच्या जवळील 15 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला; महिलेचा आक्राोश, पोलिसांकडून तपास सुरु
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
Politics Over Rahul Gandhi foreign trip : राहुल गांधींचा परदेश दौरा, भाजपचे आरोप | Special Report
Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
HSRP : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Sunetra Pawar : पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
Embed widget