Cloudfare Outage News : गेल्या तीन तासापासून जगातील प्रमुख सेवा प्रदाता क्लाउडफ्लेर (CloudFlare) मध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळं X, Facebook, Spotify सह अनेक महत्त्वाच्या सोशल मीडिया आणि स्ट्रीमिंग सेवा एकाच वेळी खंडित झाल्या आहेत. जगभरातील हजारो युजर्ससाठी X , फेसबुक यासह अनेक प्रमुख सोशल मीडिया वेबसाइट्स आणि स्पॉटिफाय (Spotify) मध्ये मोठा तांत्रिक बिघाड (डाउनटाइम) झाला आहे. अनेक युजर्सनी ॲप्लिकेशन्स वापरण्यात समस्या येत असल्याची तक्रार केली आहे.

Continues below advertisement

क्लाउडफ्लेर (CloudFlare) या सेवा प्रदात्याच्या सर्व्हरमध्ये आलेला आउटेज (Outage) आहे. क्लाउडफ्लेर वेबसाइट्सना सायबर हल्ल्यांपासून संरक्षण देण्यासाठी आणि कंटेंट जलद लोड करण्यासाठी मदत करते. तसेच अनेक सोशल मीडिया साइट्स आणि ॲप्सचे सर्व्हर याच प्लॅटफॉर्मवर होस्ट केलेले आहेत. क्लाउडफ्लेर डाउन झाल्यामुळे इंटरनेटच्या एका मोठ्या भागावर परिणाम झाला, कारण ही वेबसाइट्स सुरक्षित आणि वेगवान ठेवण्यासाठीची एक प्रमुख सेवा आहे

मोठ्या प्लॅटफॉर्मवर परिणाम

मंगळवारी झालेल्या या आउटेजमुळे 'X' (पूर्वीचे ट्विटर) सह अनेक मोठ्या डिजिटल सेवा विस्कळीत झाल्या होत्या. 'डाउनडिटेक्टर'नुसार, या बिघाडाबाबतच्या तक्रारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5:37 वाजता सर्वाधिक प्रमाणात नोंदवल्या गेल्या. फक्त भारतातच 'क्लाउडफेअर' संबंधित 3,000 हून अधिक तक्रारींची नोंद झाली होती, ज्यामुळे या घटनेची व्यापकता लक्षात येते. 'X' वरील सेवा प्रभावित झाल्यानंतर काही युजर्ससाठी प्लॅटफॉर्म काही काळासाठी पूर्ववत झाले, परंतु अजूनही अनेक युजर्स गडबडीच्या तक्रारी करत आहेत.

Continues below advertisement

नेमकं कारण काय?

ज्या सायबर सिक्युरिटी कंपनीमुळे हा बिघाड झाला, त्या 'क्लाउडफेअर'ने अधिकृत निवेदन जारी करून आउटेजची बाब मान्य केली आहे. मात्र, या आउटेजचा नेमका आणि एकूण किती वेबसाइट्सवर परिणाम झाला आहे, हे समजून घेण्यासाठी अधिक वेळ लागेल आणि त्या दिशेने काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काय आहे क्लाउडफेअर ?

'क्लाउडफेअर' ही एक अशी कंपनी आहे जी इंटरनेटचे कामकाज सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पडद्याआड काम करते. इंडिपेंडेंट (Independent) वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, 'क्लाउडफेअर' ही कंपनी 'अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस' (Amazon Web Services) सारख्या वेब-इन्फ्रास्ट्रक्चर पुरवठादारांच्या (Web-Infrastructure Providers) मोठ्या गटाचा भाग आहे. म्हणजेच, ही कंपनी वेबसाइट्सचा डेटा युजर्सपर्यंत जलदगतीने आणि सुरक्षितपणे पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करते.

महत्वाच्या बातम्या:

भारताशेजारील देशाचं मोठं पाऊल, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X वर बंदी; नेमकं कारण काय?