नवी दिल्ली : देशाचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं, प. बंगालमध्ये (West begnal) पहिल्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी रेकॉर्डब्रेक 92%, तर तामिळनाडूत 85.05% मतदान (Voting) झालं. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमृल काँग्रेसने विजयाचा दावा केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'हा सत्तापरिवर्तनाचा संकेत' आहे तर ममता बॅनर्जी यांनी देखील, 'तृणमूल काँग्रेसच सत्तेत येईल', असा दावा केलाय. गुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 294 पैकी 16 जिल्ह्यांतील 152 जागांसाठी मतदान झाले. त्यामध्ये, प्रथमच विक्रमी 92 टक्के मतदान झाले आहे. मतदानाची वाढलेली आकडेवारी पाहून सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) देखील मतदानाची आकडेवारी पाहून आनंद व्यक्त केला आहे.
पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्यात 92 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने आनंद व्यक्त केला 'भारताचा नागरिक म्हणून, मतदानाची ही टक्केवारी पाहून आपल्याला अत्यंत आनंद झाल्याच' मत मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केलं. 'जेव्हा लोक आपला मतदानाचा हक्क बजावतात, तेव्हा लोकशाही बळकट होते आणि जेव्हा नागरिक आपल्या मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व ओळखू लागतात तेव्हा ते हिंसाचारापासून दूर राहतात', असे सरन्यायायधीशांनी म्हटलं आहे.
92 टक्के मतदान ऐतिहासिक बाब - बागची
देशातील 5 राज्यात सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत'हिंसाचाराच्या कोणत्याही मोठ्या घटना घडल्या नाहीत' अस निरीक्षण न्यायमूर्ती बागची यांनी नोंदवलं. तर, 92 टक्के मतदान होणे ही एक ऐतिहासिक बाब असल्याच निरीक्षण सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी नमूदं केलं. 'युद्ध ही राजांमध्ये लढली जात असली, तरी त्यात सामान्य जनतेलाच आपला जीव गमवावा लागतो' असंही निरीक्षण न्यायमूर्ती बागची यांनी नोंदवलं आहे.
मोदी आणि ममता यांच्याकडून विजयाचा विश्वास
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 92 टक्क्यांहून अधिक मतदान झालं, तर तामिळनाडूमध्येही 234 जागांसाठी एकाच टप्प्यात झालेल्या निवडणुकीत 85.05 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत विक्रम प्रस्थापित केला. प. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी 143 जागांसाठी मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प. बंगालच्या मतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या मतदानाबद्दल अभिनंदन करीत हे राज्यातील सत्ता परिवर्तनाचे संकेत असल्याचे म्हटले आहे. तर, जनतेने एसआयआर प्रक्रियेबद्दल मतदानातून रोष व्यक्त केल्याचे सांगत तृणमूलला 125 ते 134 जागा मिळतील, असा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
हेही वाचा
आमदार संजय गायकवाडांवर छत्रपती शाहू महाराज संतापले, आमदारकी रद्द करण्याची मागणी, म्हणाले, सरकार....
