एक्स्प्लोर

CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे

CJI Surya Kant Clarifies Remarks On Youth Cockroaches: त्यांनी स्पष्ट केले की, मी विशेषतः त्या लोकांवर टीका केली होती ज्यांनी बनावट आणि बोगस पदव्यांच्या मदतीने वकिलीसारख्या व्यवसायात प्रवेश केला आहे.

CJI Surya Kant Clarifies Remarks On Youth Cockroaches: सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी त्यांच्या 'झुरळ' (cockroaches) टिप्पणीवर स्पष्टीकरण दिले असून, माध्यमांनी त्यांच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीशांनी सांगितले की, "काल एका क्षुल्लक प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मी केलेल्या तोंडी निरीक्षणांचा माध्यमांच्या एका विभागाने चुकीचा अर्थ लावला हे वाचून मला वेदना होत आहेत"

टीका बनावट पदवीधारकांवर होती

त्यांनी स्पष्ट केले की, "मी विशेषतः त्या लोकांवर टीका केली होती ज्यांनी बनावट आणि बोगस पदव्यांच्या मदतीने वकिलीसारख्या व्यवसायात प्रवेश केला आहे. अशा व्यक्तींनी माध्यम, सोशल मीडिया आणि इतर उदात्त व्यवसायांमध्ये घुसखोरी केली आहे आणि म्हणूनच ते परोपजीवींसारखे आहेत. तरुणांवर टीका केल्याचा आरोप फेटाळून लावताना ते म्हणाले, मी आपल्या देशातील तरुणांवर टीका केली असे सुचवणे पूर्णपणे निराधार आहे. मला आपल्या वर्तमान आणि भविष्यातील मानवी संसाधनाचा केवळ अभिमानच नाही, तर भारतातील प्रत्येक तरुण मला प्रेरणा देतो.

विकसित भारताचे आधारस्तंभ

त्यांनी पुढे नमूद केले की, भारतीय तरुणांना माझ्याबद्दल खूप आदर आणि सन्मान आहे हे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही आणि मी देखील त्यांच्याकडे विकसित भारताचे आधारस्तंभ म्हणून पाहतो.

नेमकं काय म्हणाले सूर्यकांत?

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका खटल्याची सुनावणी करताना देशातील बेरोजगार तरुणांना झुरळे म्हटले. ते म्हणाले, "काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, जे नंतर मीडिया, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करू लागतात." सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने एका वकिलाच्या ज्येष्ठ वकील दर्जा मिळवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेतली. खंडपीठाने वकिलाला फटकारत म्हटले, "समाजात आधीच असे परजीवी आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करतात." खंडपीठाने म्हटले की, जगातील प्रत्येकजण ज्येष्ठ वकील होण्यास पात्र असेल, पण तुम्हाला त्याचा हक्क नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने तुम्हाला ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्त केले तरी, सर्वोच्च न्यायालय तुमच्या वर्तणुकीच्या आधारावर तो निर्णय रद्द करेल.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET Exam:दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली; दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली, दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
Shivsena Operation Tiger: ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीच्या 'लीला' हॉटेलमधून थेट जयपूरला शिफ्ट; 'मनपरिवर्तन' टाळण्यासाठी शिंदेंचा मोठा गेम!
ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीच्या 'लीला' हॉटेलमधून थेट जयपूरला शिफ्ट; 'मनपरिवर्तन' टाळण्यासाठी शिंदेंचा मोठा गेम!
Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणूक! 24 पैकी 21 जागा बिनविरोध, झारखंड आणि मिझोरममधील 3 जागांसाठी आज मतदान; 'क्रॉस व्होटिंग'ची धास्ती
राज्यसभा निवडणूक! 24 पैकी 21 जागा बिनविरोध, झारखंड आणि मिझोरममधील 3 जागांसाठी आज मतदान; 'क्रॉस व्होटिंग'ची धास्ती
G7 Summit : मोदी पंतप्रधान असताना भारतावर हल्ला झाल्यास मी धावून जाईन, पंतप्रधान बदलल्यास खात्री देत नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
मोदी पंतप्रधान असताना भारतावर हल्ला झाल्यास मी धावून जाईन, पंतप्रधान बदलल्यास खात्री देत नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Exam:दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली; दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली, दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
Shiv Sena UBT Crisis: ठाकरेंच्या सेनेकडून बाळासाहेबांच्या आदेशांची आठवण, फुटीर खासदारांना थेट Y+ सुरक्षा तैनात! राऊत म्हणाले, 'फक्त अर्धा तास मला ईडी, सीबीआय द्या, पहिला गिरीश महाजनला फोडतो..'
ठाकरेंच्या सेनेकडून बाळासाहेबांच्या आदेशांची आठवण, फुटीर खासदारांना थेट Y+ सुरक्षा तैनात! राऊत म्हणाले, 'फक्त अर्धा तास मला ईडी, सीबीआय द्या, पहिला गिरीश महाजनला फोडतो..'
Sanjay Raut: आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार, लढाई आता लोकसभा, कोर्टात अन् रस्त्यावर चालेल; फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा
आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार, लढाई आता लोकसभा, कोर्टात अन् रस्त्यावर चालेल; फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate :सोने चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम, जूनमध्ये सोनं 7131 रुपयांनी घसरलं, चांदी 19650 रुपयांनी स्वस्त
सोने चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम, जूनमध्ये सोनं 7131 रुपयांनी घसरलं, चांदी 19650 रुपयांनी स्वस्त
Rajesh Kshirsagar on Eknath Shinde: आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे प्रार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?
आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे प्रार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?
Shivsena UBT Deepak Sawant Disqualification: पहिले 6 खासदार फुटले, आता BMC मध्येही ठाकरेंना धक्का; मुंबईतील नगरसेवकांची संख्या कमी होणार
पहिले 6 खासदार फुटले, आता BMC मध्येही ठाकरेंना धक्का; मुंबईतील नगरसेवकांची संख्या कमी होणार
Shivsena Operation Tiger : बंडखोर 6 खासदारांच्या वेगेळ्या गटाचे नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे सोपवणार? पोलिसांकडून जाधवांना व्हाय प्लस सुरक्षा दिली जाणार!
बंडखोर 6 खासदारांच्या वेगेळ्या गटाचे नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे सोपवणार? पोलिसांकडून जाधवांना व्हाय प्लस सुरक्षा दिली जाणार!
Anant Kalse on Shivsena Operation Tiger: व्हीप बजावूनही सहा खासदारांची बैठकीला दांडी, आता ठाकरे गटासमोर कोणते पर्याय? विधिमंडळाच्या माजी सचिवांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
व्हीप बजावूनही सहा खासदारांची बैठकीला दांडी, आता ठाकरे गटासमोर कोणते पर्याय? विधिमंडळाच्या माजी सचिवांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
Embed widget