मोदींच्या घोषनेनंतर यावर लगेच कार्यवाही करत ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून यातील 15 लोकांची नावं घोषित करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातून पुण्यातील स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांची या ट्रस्टमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने 9 फेब्रुवारीपर्यंत ट्रस्ट बनवण्याचे आदेश दिले होते. याच गोविंद देवगिरी महाराजांनी पत्रकार परिषदेत राम मंदिराच्या पायाभरणीच्या मुहूर्ताची माहिती दिली आहे. या प्रसंगी अशोक सिंघल यांची आठवण येत असल्याचे गोविंद देवगिरी महाराज म्हणाले. विश्व हिंदू परिषदेसोबत मी जोडलेलो असल्याने मला मंदिर उभारण्याची आधीपासून माहिती आहे. मंदिर उभारण्याचे दोन वर्षांपर्यंत होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
राममंदिरासाठी 15 सदस्यीय ट्रस्ट स्थापन, पुण्यातल्या 'या' महाराजांचाही समावेश
ट्रस्टमध्ये या 15 जणांचा समावेश
1. के परासरन (सुप्रीम कोर्टातील वकील)
2. शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वतीजी (प्रयागराज)
3. जगतगुरु मधवाचार्य स्वामी (कर्नाटकमधील पेजावर मठाचे पीठाधीश्वर)
4. युगपुरुष परमानंदजी महाराज (अखंड आश्रम प्रमुख, हरिद्वार)
5. स्वामी गोविंद देव गिरी (प्रवचनकर्ता)
6. विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र (अयोध्या राजपरिवाराचे वंशज)
7. डॉ. अनिल मिश्र (होमिओपॅथिक डॉक्टर)
8. कामेश्वर चौपाल (पटना)
9. महंत दिनेंद्र दास (निर्मोही आखाडा , अयोध्या)
10. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य
11. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य
12. केंद्राचा प्रतिनिधी
13. राज्याचा प्रतिनिधी
14. अयोध्येचे जिल्हाधिकारी
15. ट्रस्टी द्वारा नियुक्त अध्यक्ष
के परासरन यांचं घर ट्रस्टचा पत्ता -
सरकारने राममंदिरासाठी ज्या ट्रस्टची निर्मिती केली आहे. त्या ट्रस्टचा पत्ता के परासरन यांचं घर असणार आहे. राममंदिर प्रकरणात अनेक वर्षांपासून सुप्रीम कोर्टात केस लढणाऱ्या के परासरन यांचा पत्ता R-20 ग्रेटर कैलाश पार्ट वन, नवी दिल्ली असा आहे.
Special Report | राम मंदिर ट्रस्टच्या घोषणेमागे दिल्ली निवडणुकांचं टायमिंग? स्पेशल रिपोर्ट