नवी दिल्ली : आपचे संयोजक नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयासमोर उद्या (रविवारी) 'जेल भरो' कार्यक्रमाची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीत चांगलं काम केलं, त्यांना ते जमत नाही म्हणूनच भारतीय जनता पक्ष आम्हाला त्रास देत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. आपचे सर्व नेते उद्या (रविवारी) दुपारी 12 वाजता मुख्यालयात जाऊन अटकेची मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. रोज एका एका नेत्याला विनाकारण अटक करण्याचे सत्र सुरू आहे. त्यापेक्षा जी काही अटक करायची ती सर्वांना एकदाच करा, अशी मागणी केजरीवाल करणार आहेत. पंतप्रधानांनी जेलचा खेळ सुरु केल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. 






आम आदमी पक्षाने चांगलं काम केलं म्हणून भारतीय जनता पक्ष आम्हाला त्रास देत आहे. एकेकाला जेलमध्ये टाकलं जात आहे. त्याऐवजी लोकांची कामे होऊ नयेत, त्यांना चांगल्या सुविधा मिळू नयेत, चांगल्या शाळा आरोग्य सुविधा यापासून ते वंचित राहावेत असं वाटत असेल तर आम्हाला सगळ्यांना एकदाच अटक करा, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या