Chhattisgarh Assembly Election Result 2023 : छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या (Chhattisgarh Assembly Election 2023) 90 जागांसाठी मतमोजणी (Result) सुरू आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने (BJP) बहुमताचा आकडा पार केला आहे. छत्तीसगडमध्ये  सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजप 50 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 44 जागांवर पुढे आहे.


छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का


आज छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये सत्ताधारी पक्ष काँग्रेस आघाडीवर होता. काँग्रेस 32, भाजप 24 आणि इतर एका जागेवर आघाडीवर आहेत. सुरुवातीला पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. पण, त्यानंतरच्या कलामध्ये काँग्रेसला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघल पिछाडीवर असून त्यांचे विरोधी भाजपचे विकास बघेल आघाडीवर आहेत.


छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागांचा निकाल


छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं, त्याचा आज निकाल आहे. यावेळी 1 कोटी 55 लाखांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस पुढे होती, पण आता परिस्थिती बदलली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 33 जिल्हा मुख्यालयात 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्यांदा पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली आणि नंतर ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी करण्यात येत आहे. 


नक्षलग्रस्त भागात विशेष सुरक्षा व्यवस्था


राज्यातील नक्षलग्रस्त भागात मतमोजणीसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील निवडणूक आणि सुरक्षेशी संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती देत सांगितलं की, "राज्यातील सर्व 33 जिल्ह्यांतील मतमोजणी केंद्रांवर विशेषत: नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे." 


दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका, आज निकाल 


छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका झाल्या. पहिल्या टप्प्यात 20 जागांवर मतदान झाले, त्यापैकी 12 बस्तर विभागातील नक्षलग्रस्त जागा होत्या. 7 नोव्हेंबरला मतदानादरम्यान काही ठिकाणी नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक पाहायला मिळाली. त्याचवेळी 17 नोव्हेंबरला 70 जागांवर मतदान झाले होते.


छत्तीसगडमध्ये भाजपचं अर्धशतक पूर्ण 


राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 46 जागांची आवश्यकता असते. आतापर्यंतच्या कलानुसार, भाजपनं अर्धशतक पूर्ण केलं आहे. छत्तीसगडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत दिसून येत आहे. पाटण मतदारसंघातून मुख्यमंत्री भूपेश बघेल हे भाजपच्या विजय बघेल यांच्यापेक्षा 415 मतांनी पुढे आहेत. अंबिकापूर मतदारसंघातून उपमुख्यमंत्री टीएस सिंगदेव हे भाजपचे राजेश अग्रवाल यांच्यापेक्षा 672 मतांनी पुढे आहेत. चित्रकोट मतदारसंघातून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दीपक बैज हे भाजपच्या विनायक गोयल यांच्यापेक्षा 199 मतांनी पुढे आहेत.