चंदीगड : हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीचा पाठलाग आणि छेडछाड प्रकरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींसह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपवर टीकेचा भडिमार केला आहे. कारण हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलावर पाठलाग आणि छेडछाड केल्याचा आरोप आहे. महत्त्वाचं म्हणजे या गंभीर गुन्ह्यातही त्याला सहजरित्या जामीन मिळाला आहे.

हरियाणा भाजपचे अध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकासला छेडछाडीच्या आरोपात अटक करण्यात आली होती. पण अटकेनंतर त्याची जामीनावर सुटका झाल्याने जोरदार विरोध होत आहे. विरोधक आरोपींविरोधात कठोर कारवाईसह सुभाष बराला यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
हरियाणामध्ये एका आयएएस अधिकारी विरेंदर कुंडू यांची मुलगी वर्णिकाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलावर विकासवर छेडछाडीचा आरोप केला आहे. तरुणीच्या आरोपानुसार, विकास बराला आणि त्याचा मित्र आशिष कुमार एका पेट्रोल पंपापासूनच तिच्या कारचा पाठलाग करत होते आणि कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रसंगावधान दाखवत पोलिसांना फोन केला. घटनास्थळी पोहोचलेल्या दोन जणांना अटक केली. यानंतर तरुणीने फेसबुकवर पोस्ट लिहिली. मी सुदैवी आहे की बलात्कारानंतर मी नाल्यात सापडले नाही," असं तिने लिहिलं आहे.

सीसीटीव्ही फुटेज गायब, आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न?
दरम्यान या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ज्या परिसरात छेडछाड झाली होती, त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेजही बेपत्ता आहे. सेक्टर 26 आणि सेक्टर 7 मधील पाच ठिकाणांचे फुटेज गायब आहे. त्यामुळे पोलिस आरोपीला वाचवत असल्याचा आरोप होत आहे. विकास बरालावर लागलेलं कलम 365 आणि 511 वर कायदेशीर सल्ला हरियाणा पोलिस घेणार आहेत. गरज पडल्यास विकासला पुन्हा अटक होऊ शकते. आरोपींना ज्यूस आणि कॉफी दिल्याचाही आरोप पोलिसांनी करण्यात येत आहे.

विरोधकांची भाजपवर सडकून टीका
चंदीगडची घटना केवळ छेडछाड नाही तर अपहरणाचा प्रयत्न असल्याचं सांगत आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधींनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "चंडीगडमध्ये तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न आणि छेडछाडीच्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. भाजप सरकारने गुन्हेगार आणि त्यांच्या गलिच्छ मानसिकतेचा साथ देऊ नये, त्यांना शिक्षा द्यायला हवी, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.

https://twitter.com/OfficeOfRG/status/894214011704664064

या प्रकरणावरुन काँग्रेस कार्यकर्ते राज्यभर ठिकठिकाणी भाजपचा निषेध करत आहे. तर रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रविवारी या घटनेच्या निषेधार्थ भाजप सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

वर्णिका कुंडूची फेसबुक पोस्ट