पाकिस्तानच्या या आगळीकीचं भारतीय लष्करही चोख उत्तर देत आहे. पाकिस्तानकडून दोन बॉम्बहल्ले करण्यात आले. यातील एका बॉम्ब नौसेरा सेक्टरमध्ये राहणाऱ्या मोहम्मद हनीफ यांच्या घराजवळ पडला. ज्यामध्ये हनीफ आणि त्याची पत्नी जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथं त्याच्या पत्नीला मृत घोषित करण्यात आलं.
दरम्यान, काल रात्री 11 वाजता सुरु करण्यात आलेला गोळीबार थोडा कमी झाला आहे. मात्र, अधूनमधून हल्ला सुरुच आहे. त्यामुळे या परिसरातील शाळा आज बंदच ठेवण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या:
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एका पोलिसासह तीन नागरिकांचा मृत्यू
लष्कराच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांचा हल्ला, 2 जवान जखमी
जम्मूत दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पाच रायफल लुटल्या
शोकाकूल वातावरणात शहीद परमजीत सिंह यांना अखेरचा निरोप
पाकिस्तानकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना
जम्मूत एटीएम कॅश व्हॅनवर दहशतवादी हल्ला, पाच पोलीस शहीद