CBSE 12th result 2018 LIVE : नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. गाझियाबादची मेघना श्रीवास्तव देशात पहिली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहेत. यंदा सीबीएसईचा निकाल 83.01 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात एक टक्क्याने वाढ झाली आहे. मागच्या वर्षीचा निकाल 82.02 टक्के होता. मार्च-एप्रिल महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेला देशभरातून एकूण 11, 86, 306  विद्यार्थी बसले होते. 4, 138 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. पेपर लीकमुळे ही परीक्षा वादात सापडली होती. पेपर लीकमुळे वाद खरंतर सीबीएसई बारावीची परीक्षा 13 एप्रिल रोजी संपणार होती. शेवटचा पेपर फिजिकल एज्युकेशन विषयाचा होता. पण देशातील अनेक ठिकाणी पेपर लीक झाल्याने अर्थशास्त्राचा पेपर रद्द करण्यात आला होता. 25 एप्रिल रोजी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा घेण्यात आला होता. दहावी-बारावीच्या निकालाची तारीख लवकरच जाहीर करु: बोर्ड निकाल कुठे पाहता येणार? विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटसह cbseresults.nic.in, results.nic.in आणि results.gov.in वर पाहता येणार आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मायक्रोसॉफ्टने एक खास अॅप बनवलं असून विद्यार्थी तिथे आपला निकाल पाहू शकतात. याशिवाय मेसेजद्वारेही तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. बारावीच्या निकालासाठी मेसेज बॉक्समध्ये जा. तिथे cbse12 <rollno> <sch no> <center no> लिहा आणि 7738299899 ह्या नंबरवर पाठवा.