Child Sexual Pornography : सध्या केंद्रीय तपास यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आहेत. ऑनलाईन चाईल्ड पोर्नोग्राफी (Child Sexual Pornography) प्रकरणी सीबीआयकडून (CBI) देशभरात मोठी कारवाई सुरु आहे. देशभरात सीबीआयने छापेमारी करत धडक कारवाई केली आहे. 20 राज्यांमध्ये सीबीआयची कारवाई करण्यात येत असून 56 ठिकाणी छापसत्र सुरु आहेत. इंटरपोलच्या माहितीनंतर सीबीआयची देशभरात छापेमारी करत ही मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या धडक कारवाईला 'ऑपरेशन मेघचक्र' (Operation Meghchakra) असं नाव दिलं आहे. सीबीआयने मुंबईमध्येही चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी छापेमारी केली आहे. 20 राज्यांमध्ये सीबीआयकडून छापे सुरु आहेत.


इंटरपोलकडून इनपुट मिळाल्यानंतर CBIची कारवाई


इंटरपोलकडून इनपुट मिळाल्यानंतर सीबीआयनं देशभरात कारवाईला सुरुवात केली आहे. सीबीआयला मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई केवळ चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधितच नाही, तर याचा संबंध लहान मुलांना फिजिकल ब्लॅकमेल, लहान मुलांचं शारीरिक शोषण (Physically Blackmail) या प्रकरणाशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळीकडून वेगवेगळे ग्रुप बनवून आणि वैयक्तिक पातळीवर काम सुरु होतं.






सीबीआयला मिळाली 'ही' माहिती


इंटरपोलच्या माध्यमातून सीबीआयला सिंगापूरमधून या प्रकरणी माहिती मिळाली. त्यानंतर सीबीआयकडून देशभरात छापेमारी करत कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयकडून महाराष्ट्रासह दिल्ली, बंगळुरू, पाटणा अशा 20 राज्यांमध्ये छापसत्र सुरु आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी देखील ऑपरेशन केले गेले होते ज्याचे नाव ऑपरेशन कार्बन होते.


केंद्रीय तपास यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये


सध्या देशात केंद्रीय तपास यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये असल्याचं दिसत आहे. एकीकडे दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि एटीएसकडून (ATS) कारवाई सुरु आहे. देशभरात एनआयएनं तपास यंत्रणांच्या मदतीनं पीएफआय या संघटनेशी संबंधितांवर छापे टाकले आहेत. महाराष्ट्रातही एटीएसच्या मदतीनं NIAनं PFI वर मोठी कारवाई केलीय. या कारवाईत महाराष्ट्रात आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या