Government Advice to Private News Channels : केंद्र सरकारने खासगी वृत्तवाहिन्यांसाठी एक सल्ला (Government Advice to Private News Channels) दिला आहे. ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि मोठ्या अपघातांची माहिती देताना घटनेची तारीख आणि वेळ लिहिणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली आहे. अपघात किंवा आपत्तीनंतर काही दिवसांनी टेलिव्हिजन चॅनेलवर दाखवले जाणारे फुटेज वास्तविक-वेळची परिस्थिती दर्शवू शकत नाही. त्यामुळं घटनास्थळांवर तारीख आणि वेळ लिहिणं आवश्यक असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे. 


प्रेषकांमध्ये गैरसमज होऊ नये 


प्रेषकांमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज होऊ नये म्हणून सर्व खासगी टीव्ही चॅनेलना नैसर्गिक आपत्ती किंवा मोठ्या अपघातांच्या दृश्यांमध्ये तारीख आणि वेळ फुटेजच्या शीर्षस्थानी प्रदर्शित करणे आवश्यक आहे. याची खात्री करण्यास सांगितलं आहे. वृत्तवाहिन्या नैसर्गिक आपत्ती आणि मोठ्या अपघातांचे अनेक दिवस सतत कव्हरेज करत असतात. मात्र, घटनेच्या दिवसापासूनचे फुटेज दाखवत राहतात. मंत्रालयाने असा युक्तिवाद केला की अपघात किंवा आपत्तीनंतर अनेक दिवसांनी टेलिव्हिजन चॅनेलद्वारे दर्शवल्या जाणाऱ्या फुटेजमध्ये वास्तविक वेळेची परिस्थिती प्रतिबिंबित होत नाही. ज्यामुळं दर्शकांमध्ये अनावश्यक गोंधळ आणि संभाव्य दहशत निर्माण होते.


नियमांचे पालन करण्यावर भर


अपघात किंवा आपत्तीनंतर अनेक दिवसांनी टेलिव्हिजन चॅनेलद्वारे दर्शविलेले फुटेज वास्तविक-वेळची परिस्थिती प्रतिबिंबित करत नाही. ज्यामुळं दर्शकांमध्ये गोंधळ आणि घबराट निर्माण होते. त्यामुळं त्यावेळची वास्तवीक वेळ दाखवणं गरजेचं असल्याचा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. खासगी वृत्तवाहिन्यांनी अशा घटनांचे प्रसारण करताना नियमांचे पालन केले पाहिजे, याची खात्री करण्यावर भर देण्यात आला आहे. वायनाड, केरळ आणि हिमाचल प्रदेशमधील भूस्खलनाच्या व्यापक कव्हरेजच्या पार्श्वभूमीवर ही सूचना जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता. 


प्रेषकांची गफलत होऊ नये म्हणून तारीख आणि वेळ देणं गरजेचं


अनेकदा मोठ्या नैसर्गीक घटना किंवा मोठे अपघात घडतात. अशा मोठ्या घटनांच्या बातम्या किंवा माहिती अनेकदा वृत्तवाहिन्यांवर प्रकाशीत केली जाते. मात्र, अनेकदा माहिती प्रकाशीत करताना ज्यावेळी घटना घडली त्यावेळची तारीख आणि वेळ दिली जात नाही. यामुळं प्रेषकांची गफलत होण्याची शक्यता असते. कारण नेमकी घटना घडली कधी? यावरुन ते स्पष्ट होत नाही. त्यामुळं वृत्तवाहिन्यांनी आपत्तीच्या घटना देताना काळजी घेणं गरजेचं आहे. वेळ आणि तारीख देणं गरजेचं असल्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


भारताविरोधी खोट्या बातम्या पसरविणाऱ्या पाकिस्तानच्या 20 यूट्यूब चॅनेलवर कारवाई