चंदीगड : मोदी लाटेमध्येही काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले कॅप्टर अमरिंदर सिंह यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर निवडणुकीआधी काँग्रेसचा हात पकडलेले नवज्योतसिंह सिद्धू कॅबिनेट मंत्री बनले आहेत.


नवज्योतसिंह सिद्धू यांचं पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न भंगणार?

कॅप्टन अमरिंदर सिंह दुसऱ्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याआधी 2002-2007 पर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री होते. कॅप्टन अमरिंदर सिंह हे पंजाबचे 26वे मुख्यमंत्री बनले आहेत.

अमरिंदर सिंहांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद नाही?

पंजाबमध्ये दहा वर्षानंतर काँग्रेसचं पुनरागमन झालं आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने शिरोमणी अकाली दल, आम आदमी पक्ष तसंच भाजपला धूळ चारत बहुमत मिळवलं. आता कॅप्टन सिंह यांनी दुसऱ्यांदा पंजाबची धुरा सांभाळली आहे.

पंजाबचा विजय काँग्रेसचा की कॅप्टन अमरिंदर सिंहांचा?

पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 117 जागांपैकी 77 जागांवर विजय मिळवला आहे.

पंजाबमध्ये अकाली दलाला झटका, काँग्रेसला बहुमत

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचं मंत्रिमंडळ

ब्रह्मा मोहिंद्रा

नवजोतसिंह सिद्धू

मनप्रीत सिंह बादल

साधु सिंह धर्मसोत

तृप्त राजिंदर सिंह

राणा गुरजीत सिंह

चरणजीत सिंह चन्नी

अरुणा चौधरी

रजिया सुल्ताना