नवी दिल्ली: १८ व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (BRICS Summit 2026) आज भारतात दाखल झाले आहेत. गेल्या जवळपास सात वर्षांमधील त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग (BRICS Summit 2026) यांच्यात अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. २०२० च्या गलवान खोऱ्यातील सीमावादानंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत निर्णायक मानली जात आहे.(BRICS Summit 2026)

Continues below advertisement

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेसाठी भारतात आगमन झाले असून, विमानतळावर केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी त्यांचे स्वागत केले. जी-२० नंतर होणाऱ्या या मोठ्या जागतिक परिषदेसाठी शी जिनपिंग यांच्याआधीच जगातील अनेक प्रमुख आणि दिग्गज नेते भारतात दाखल झाले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.(BRICS Summit 2026)

BRICS Summit 2026 :  पंतप्रधान मोदींसोबत बैठकीची वेळ आणि दिवसभराचा कार्यक्रम

पंतप्रधान मोदी आज इथिओपिया, मलेशिया, अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स, व्हिएतनाम आणि चीनच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जिनपिंग यांचा आजचा संपूर्ण कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल:

दुपारी १२:३० वाजता: शी जिनपिंग यांचे दिल्लीत आगमन व हॉटेलकडे प्रयाण.

दुपारी २:०० वाजता: भारत मंडपम येथे आगमन.

दुपारी २:३० वाजता: १८ व्या ब्रिक्स परिषदेचा प्रारंभ.

संध्याकाळी ५:०० वाजता: ब्रिक्स नेत्यांचा 'फॅमिली फोटो'.

संध्याकाळी ५:३० वाजता: ब्रिक्स नेत्यांकडून वृक्षारोपण.

संध्याकाळी ५:४५ वाजता: पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची भारत मंडपम येथे द्विपक्षीय बैठक.

रात्री ७:३० वाजता: पंतप्रधान मोदींनी जागतिक नेत्यांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा (Dinner) कार्यक्रम.

BRICS Summit 2026 :  संबंध स्थिर करण्याचे प्रयत्न

२०२० च्या गलवान चकमकीनंतर भारत आणि चीन आपल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये स्थिरता आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखणे हीच द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीसाठी मुख्य अट असल्याचे भारताने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. यापूर्वी रशियातील कझान आणि चीनमधील तियानजिन येथील भेटींनंतर, सलग तिसऱ्या वर्षी दोन्ही नेत्यांमध्ये ही थेट भेट होत आहे. नुकत्याच बिश्केक येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेतही दोन्ही नेत्यांमध्ये संक्षिप्त चर्चा झाली होती.