By Polls 2021 : भाजपनं केंद्र शासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशच्या तीन लोकसभा जागांवर आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यासोबतच भाजपनं वेगवेगळ्या राज्यांच्या 16 विधानसभेच्या जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी यादी जारी केली आहे. या जागांवर 30 ऑक्टोबर रोजी निवडणुका पार पडणार आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचं काही महिन्यापूर्वी त्याचं दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे देगलूर बिलोली मतदार संघाची ती जागा आता रिक्त झालीय. त्यामुळे त्या विधानसभेसाठी येणाऱ्या काही दिवसांत पोटनिवडणूक होणार आहेत. देगलूर-बिलोली-90 राखीव मतदारसंघातून अनेक आजी माजी आमदार, सामाजिक कार्यकर्ते ,उद्योजक विविध पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी धडपडत आहेत. 30 ऑक्टोबर रोजी या जागेसाठी मतदान होणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपने कंबर कसली आहे.
शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे (Subhash Sabane) यांनी भाजपमध्ये (BJP)प्रवेश केला. देगलूर पोटनिवडणुकीसाठी साबणेंना भाजपकडून तिकीट दिलं जाणार असल्याचं समोर आलं आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीतही 2014 मध्ये ज्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली त्या समाधान आवताडेंना भाजपनं तिकीट देत निवडून आणलं होतं. आता त्यामुळं या निवडणुकीकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे.
लोकसभेच्या तीन जागांवर कोण-कोण उमेदवार?
भाजपकडून महाराष्ट्रातून सुभाष साबणे, दादरा आणि नगर हवेलीहून महेश गावित, मध्य प्रदेशातील खंडवामधून ज्ञानेश्वर पाटील आणि हिमाचल प्रदेशातील मंडिहून ब्रिगेडियन खुशाल ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
16 विधानसभेच्या जागांवर BJP उमेदवारांची यादी :
आंध्र प्रदेश, बाडवेल : पुन्थाला सुरेश
हरियाणा, ऐलानाबाद : गोविंद कांडा
हिमाचल प्रदेश, फतेहपूर : बलदेव ठाकूर
हिमाचल प्रदेश, आर्की : रतन सिंह पाल
हिमाचल प्रदेश, जुब्बल खोटखे : नीलम सरायक
कर्नाटक, सिंदगी : रमेश भुसानेरू
कर्नाटक, हंगल : शिवाराज सज्जनार
मध्य प्रदेश, पृथ्वीपूर : शिशुपाल सिंह यादव
मध्य प्रदेश, रायगांव : प्रतिमा बागरी
मध्य प्रदेश, जॉबट : सुलोचना रावत
राजस्थान, वल्लभनगर : हिम्मत सिंह झाला
राजस्थान, धरियावाड : खेत सिंह मीना
पश्चिम बंगाल, दिनहाता : अशोक मंडल
पश्चिम बंगाल, शांतिपूर : निरंजन बिस्वास
पश्चिम बंगाल, खरदाहा : जॉय साह
पश्चिम बंगाल, गोसाबा : पालाश राणा
दरम्यान, देशात वेगवेगळ्या कारणांमुळे तीन लोकसभा आणि 30 विधानसभेच्या जागांसाठी 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुका पार पडणार आहेत. ज्या राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा रिक्त आहेत. दादरा आणि नागर हवेली आणि दमन, मध्य प्रदेश-खंडवा आणि हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा जागांचाही समावेश आहे. त्यासोबतच 14 राज्यांच्या 30 वेगवेगळ्या विधानसभेच्या जागांसाठीही पोटनिवडणुका होणार आहेत.
कोणत्या राज्यांमध्ये विधानसभेच्या किती जागांसाठी निवडणुका?
आंध्र प्रदेश : एक जागा
असम : पाच जागा
बिहार : दो जागा
हरियाणा : एक जागा
हिमाचल प्रदेश : तीन जागा
कर्नाटक : दो जागा
मध्य प्रदेश : तीन जागा
महराष्ट्र : एक जागा
मेघालय : तीन जागा
मिझोरम : एक जागा
नगालँड : एक जागा
राजस्थान : दो जागा
तेलंणाना : एक जागा
पश्चिम बंगाल : चार जागा