नवी दिल्ली : त्रिपुरा मेघालय आणि नागालँडमधील भरघोस यशानंतर आज (मंगळवार) नवी दिल्लीत भाजपाच्या संसदीय बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला पंतप्रधान मोदींसह भाजपचे नेते लालकृष्ण आडवाणीही हजर आहेत.
अधिवेशन काळात दर मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक घेण्यात येते. त्यामुळे आजही या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बैठकीसाठी सभागृहात येताच ‘जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है.’ अशा घोषणा भाजप खासदारांनी देण्यास सुरुवात केली. ईशान्य भारतातील विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये सध्या नवा जोश पाहायला मिळतो आहेत.
दरम्यान, कालपासूनच (सोमवार) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यावेळी संसदेत अनेक विधेयकं पारित करण्याचं आव्हान सरकारसमोर असणार आहे. याच सर्व गोष्टींबाबत आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
‘जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है’, भाजप खासदारांकडून घोषणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Mar 2018 10:33 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बैठकीसाठी सभागृहात येताच ‘जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है.’ अशा घोषणा भाजप खासदारांनी देण्यास सुरुवात केली.
फोटो सौजन्य : एएनआय
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -