विधानसभा निवडणूक : चार राज्यांत मुख्यमंत्री पदासाठी 'ही' नावं चर्चेत
पाच राज्यांचे कल समोर आल्यानंतर मध्य प्रदेश वगळता सत्ता स्थापनेचं चित्र जवळपास स्पष्ट होतांना दिसत आहे. भाजपच्या हातून राजस्थान आणि छत्तीसगड खेचून आणण्यात काँग्रेसला यश आलं आहे, तर मध्य प्रदेशात मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर आहे. तेलंगणात मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे, तर मिझोरम मात्र काँग्रेसच्या हातून निसटलं. मिझोरम नॅशनल फ्रन्ट मिझोरममध्ये सत्ता स्थापन करत आहे. निवडणुकीच्या निकालनंतर आता मुख्यमंत्री कोण होणार या चर्चा रंगू लागल्या आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असली तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचं नाव त्याठिकाणी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे.पाच राज्यांच्या निकालानंतर भाजप कार्यालयाबाहेर शुकशुकाट
एबीपी माझा वेब टीम | 11 Dec 2018 07:53 PM (IST)
दिल्लीतील मुख्यालयासह देशभरातील सर्वच कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निकालांमध्ये भाजपचा सुपडासाफ झाला आहे. निकालांचे कल हाती येताच भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयासह देशभरातील सर्वच कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. 2014 नंतर प्रत्येक निवडणुकीत विजयानंतर भाजपच्या मुख्यालयात भव्य मंडप उभारला जायचा. कार्यकर्त्यांची जल्लोषासाठी मोठी गर्दीही व्हायची. कोणत्याही निकालानंतर पुष्पवर्षाव झेलत पंतप्रधान मोदींचं आगमन मुख्यालयात व्हायचं आणि त्यानंतर देशाला संबोधित करणारं भाषणही व्हायचं. मात्र आजच्या निकालांनंतर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी करण्यात आली. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बहुमत मिळवले आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सध्या आघाडीवर असून बहुजन समाज पार्टी तसेच समाजवादी पार्टीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.