Threat To Gautam Gambhir : माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांना ISIS कश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू, अशी धमकी गौतम गंभीरला मिळाली आहे. गौतम गंभीरला ई-मेलवर धमकीचं पत्र मिळालं. त्यानंतर गौतम गंभीर आणि कुटुंबाच्या सुरक्षेत मोठी वाढ कऱण्यात आली आहे.


दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांना धमकीचा मेल आला. त्यानंतर गंभीर यांनी तात्काळ दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत तात्काळ वाढ करण्यात आली आहे. गौतम गंभीर यांना 'ISIS कश्मीर' ने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळताच डीसीपी श्वेता चौहान यांनी तात्काळ तपास प्रक्रिया वेगानं सुरू केली आहे. डीसीपी श्वेता चौहान म्हणाल्या की, 'गौतम गंभीर यांना धमकी मिळाली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. गौतम गंभीर यांच्या सुरक्षेत वाढ कऱण्यात आली आहे. त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.'






माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळालेला मेलही शेअर करण्यात आला. यामध्ये ISIS कश्मीरच्या नावाने मेल आलाय. धमकीच्या मेलनंतर गौतम गंभीर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.


गौतम गंभीर यांना आलेला धमकीचा मेल -




क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीर यांनी राजकारणात प्रवेश केला. आपल्या बेधडक वक्तव्यामुळे गौतम गंभीर नेहमीच चर्चेत असतात. प्रसारमाध्यमांत अथवा सोशल मीडियावर गौतम गंभीर आपलं मत व्यक्त करत असतात. दहशतवादाविरोधात गौतम गंभीर यांनी परखड मतं व्यक्त केली आहेत. त्यामुळेच त्यांना हा धमकीचा मेल आल्याचं बोललं जात आहे.