Pune Jeffrey Epstein Files :  एपस्टीन फाईल्सच्या आवृत्तीतून आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. बिल गेट्स यांचे माजी आर्थिक सल्लागार एपस्टीन आणि बिल अॅन्ड मेलिंडागेट्स फाऊंडेशनचे माजी सल्लागार होरिस निकोलिक यांच्यातील आमेल चॅटिंग समोर आली आहे. जेफ्री एपस्टीनला 2012 मध्ये पाठवलेल्या ईमेलमध्ये निकोलिक यांनी भारताविषयी विशेषत: पुणे शहराविषयी पुण्याविषयीचा तिरस्कार व्यक्त केला होता. पुण्याला घाणेररडे शहर असे म्हटलं होतं.

Continues below advertisement

एपस्टीन आणि बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे माजी सल्लागार बोरिस निकोलिक यांच्यातील ईमेलमधील संवाद समोर

बोरिस निकोलिकने जेफ्री एपस्टीनला पाठवलेल्या ईमेलमध्ये पुण्याला 'घाणेरडे' म्हणून टीका केली होती.  तसेच विमान प्रवासाला झालेल्या विलंबाबद्दल निराशा व्यक्त केली होती. भारताविषयी असणारी नापसंती यातून व्यक्त करण्यातच आली होती.  शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या एपस्टाईन फाइल्सच्या नवीन आवृत्तीमध्ये एपस्टीन आणि बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे माजी सल्लागार बोरिस निकोलिक यांच्यातील ईमेलमधील संवाद समोर आला आहे. जेफ्री एपस्टाईन यांना 2012 मध्ये पाठवलेल्या ईमेलमध्ये निकोलिक यांनी भारताविषयी, विशेषतः पुणे शहराबद्दल, आपला नापसंतीचा भाव वारंवार व्यक्त केला होता.

बिल गेट्सच्या माजी सल्लागाराने पुण्याबद्दल काय म्हटले?

अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी जेफ्री एपस्टीन यांच्या फाइल्सचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संच जारी केला. या प्रचंड संचामध्ये 30 लाखांहून अधिक पानांची कागदपत्रे आणि हजारो छायाचित्रे आहेत.  शुक्रवारी जारी केलेल्या फाइल्समध्ये बोरिस निकोलिक आणि जेफ्री एपस्टीन यांच्यातील पत्रव्यवहाराचा समावेश आहे. एपस्टीन हा गुन्हेगार होता आणि 2019 मध्ये तुरुंगात असताना त्याने आत्महत्या केली होती. हे ईमेल 2012 मध्ये निकोलिक भारतात प्रवास करत असताना पाठवले गेले होते. एका वृत्तपत्राने एकेकाळी बिल गेट्सच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून वर्णन केलेल्या निकोलिकने पुण्याला 'अतिशय घाणेरडे' म्हटले होते. तसेच त्याने दोन दिवस हॉटेलमधून बाहेर पडण्यास नकार दिला होता.

Continues below advertisement

एपस्टीन फाईल्स म्हणजे नेमकं काय? 

एपस्टीन फाईल्स म्हणजे एफबीआय आणि अमेरिकन न्याय विभागाने तपासादरम्यान गोळा केलेले सुमारे 300 GB पेक्षा जास्त डेटा, मुलाखतींचे ट्रान्स्क्रिप्ट्स, फोटो आणि व्हिडिओ आहेत. 2019 मध्ये एपस्टीनच्या मृत्यूनंतर हा डेटा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. आता 'एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट' अंतर्गत हे दस्तऐवज सार्वजनिक केले जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Prithviraj Chavan: अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?