मुंबई : बिल्कीस बानो (Bilkis Bani) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशावर आनंद व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता बिल्कीस बानोसोबत घृणास्पद कृत्य करणारे आणि तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करणारे 11 दोषी लवकरच तुरुंगात जाणार आहेत. यावर बल्किस बानो यांनी म्हटलं की, आजचा दिवस माझ्यासाठी खरोखर नवीन वर्ष आहे.


पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बिल्कीस बानो यांनी त्यांच्या वकिल शोभा गुप्ता यांच्या हवाल्याने म्हटलं की, हे माझ्यासाठी आनंदआश्रू आहेत. मी दीड वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी हसले होते. मी माझ्या मुलांना मिठी मारली. माझ्या छातीवरुन  डोंगराएवढा मोठा दगड काढल्याचा भास होतो  आणि त्यामुळे पुन्हा एकदा श्वास घेऊ शकते. पुढे त्यांनी म्हटलं की, न्याय हा असाच असतो. मला, माझ्या मुलांना आणि स्त्रियांना सर्वत्र समान न्याय दिल्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचे विशेष आभार मानते. 


कठीण काळात त्यांनी माझा हात धरला - बिल्कीस बानो


 बिल्कीस बानो यांनी म्हटलं की, मी जो प्रवास केला तो कधीच एकट्याने केला जाऊ शकत नाही. यामध्ये माझे पती आणि माझी मुले माझ्यासोबत आहेत. माझे मित्र आहेत ज्यांनी द्वेषाच्या काळातही माझ्यावर खूप प्रेम केले आणि प्रत्येक कठीण वळणावर माझा हात धरला. माझ्याकडे एक असाधरण वकील शोभा गुप्ता आहेत. ज्यांनी 20 वर्षांपेक्षा अधिक माझ्यासोबत आहेत. त्यानींच मला न्याय मिळवण्यासाठी प्रेरणा दिली. 


लाखो लोक माझ्यासाठी उभे राहिले - बिल्कीस बानो


बिल्कीस बानो म्हणाल्या की, दीड वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट 2022 रोजी दोषींना लवकरात लवकर सुटका करण्यात आल्याने मी कोलमडून गेले होते. लाखो लोक माझ्यासाठी एकत्र येईपर्यंत माझं सर्व धैर्य मी गमावलं होतं. देशातील हजारो लोक आणि महिला पुढे आल्या, माझ्या पाठीशी उभे राहिले, माझ्या बाजूने बोलले आणि सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.


गुजरात सरकारने अधिकारांचा दुरुपयोग केला - सर्वोच्च न्यायालय


सुप्रीम कोर्टाने सोमवारी (8 जानेवारी) बिल्कीस बानोच्या 11 दोषींना शिक्षेची देण्यात आलेली सूट रद्द केलीये. 2002 मध्ये गुजरात दंगलीच्या वेळी गुन्हेगारांनी हा गुन्हा केला होता. गुजरात सरकारने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 11 दोषींना दोन आठवड्यांच्या आत तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले.


हेही वाचा : 


Bilkis Bano Case: सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला दणका; बिल्कीस बानोच्या आरोपींच्या सुटकेचा निर्णय रद्द