Bihar SIR Update : बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या Special Intensive Revision म्हणजे विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रक्रियेत आधीच 52 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. आता निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मृत नागरिकांच्या नावेही हा फॉर्म भरला जात आहे, तर काही ठिकाणी खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे परस्पर फॉर्म भरले जात असल्याचा आरोप केला जात आहे.ADR (Association for Democratic Reforms) आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) यांच्याकडून या प्रकरणी निवडणूक आयोगावर अनियमिततेचे अनेक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

Bihar SIR Controversy :काय आहेत आरोप?

- BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) स्वतःच मतदार गणना फॉर्मवर हस्ताक्षर करत असल्याचे आढळले.

- मृत व्यक्तींचेही फॉर्म भरले गेले, तर काही नागरिकांनी फॉर्म भरले नसतानाही त्यांना 'तुमचे फॉर्म पूर्ण झाले आहेत' असा मेसेज आला आहे.

- अनेक मतदारांनी सांगितले की ते कधीही BLO ला भेटले नाहीत, ना कुठल्याही कागदावर स्वाक्षरी केली. तरीही त्यांचे फॉर्म ऑनलाइन अपलोड झाले आहेत.

- खोटी स्वाक्षरी करून फॉर्म भरले जात असल्याचेही आरोप आहेत.

Election Commission On Bihar SIR : निवडणूक आयोगाची बाजू

निवड आयोगाने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झाली नाही. ही प्रक्रिया मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी आवश्यक आहे, जेणेकरून अयोग्य नावं हटवता येतील.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 28 जुलै 2025 रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. यापूर्वी 10 जुलै रोजी, न्यायमूर्ती सुधांशु धूलिया आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने सांगितले होते की, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड यांचा पुरावा म्हणून विचार होऊ शकतो.

What Is SIR Bihar : काय आहे SIR?

24 जून 2025 रोजी निवडणूक आयोगाने बिहारमध्ये Special Intensive Revision (SIR) सुरू केली. यामध्ये राज्यातील मतदारांची नामावली पूर्णपणे पुनर्तपासून तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व अपात्र मतदारांची नावे वगळणे, आढळून येणाऱ्या त्रुटी दूर करणे आणि मतदान प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करणे हा त्यामागे उद्देश असल्याचं सांगितलं जातंय.

निवडणूक आयोगाच्या पहिल्या प्राथमिक तपासणीत 52 लाखांहून अधिक मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत. यामध्ये मृत, स्थलांतरित किंवा दोन ठिकाणी मतदार असल्याच्या गोष्टींचा समावेश आहे.

Bihar Election Voter List : किती नावे वगळण्यात आली?

- अंदाजे 18-22 लाख जण मृत म्हणून नोंदणीकृत; त्यांच्या नावांची नोंद वगळण्यात आली आहे.

- सुमारे 26–35 लाख मतदार हे कायमस्वरूपी दुसर्‍या जिल्हा/राज्यात स्थलांतरित आहेत.

- सुमारे 7 लाख मतदार एका किंवा अनेक ठिकाणी नोंदणीकृत असल्याचे आढळले आहे.

- चुकीच्या नोंदींचा भाग असलेले अंदाजे 1 लाख मतदार हे शोधता येणारे नाहीत.

बिहारमधील SIR प्रक्रिया आता न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. जर आरोप खरे ठरले, तर मोठ्या प्रमाणावर मतदारांवर अन्याय झाला असल्याचे स्पष्ट होईल. एकीकडे निवडणूक आयोग पारदर्शकतेचा दावा करत आहे, तर दुसरीकडे नागरिक आणि राजकीय पक्ष या प्रक्रियेवर संशय व्यक्त करत आहेत.

ही बातमी वाचा: