एक्स्प्लोर

बिहारमध्ये मृत नागरिकही निवडणुकीचा SIR फॉर्म भरत आहेत; निवडणूक आयोगाच्या दाव्यावर ADR चे प्रश्नचिन्ह, सर्वोच्च न्यायालयात याचिका

Bihar SIR : निवडणूक आयोगाच्या बूथ लेव्हल ऑफिसरकडून परस्पर स्वाक्षरी करून फॉर्म भरले जात असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच मृतांच्या नावेही हा फॉर्म भरला जात असल्याचं समोर आलं आहे.

Bihar SIR Update : बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या Special Intensive Revision म्हणजे विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रक्रियेत आधीच 52 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. आता निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मृत नागरिकांच्या नावेही हा फॉर्म भरला जात आहे, तर काही ठिकाणी खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे परस्पर फॉर्म भरले जात असल्याचा आरोप केला जात आहे. ADR (Association for Democratic Reforms) आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) यांच्याकडून या प्रकरणी निवडणूक आयोगावर अनियमिततेचे अनेक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

Bihar SIR Controversy : काय आहेत आरोप?

- BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) स्वतःच मतदार गणना फॉर्मवर हस्ताक्षर करत असल्याचे आढळले.

- मृत व्यक्तींचेही फॉर्म भरले गेले, तर काही नागरिकांनी फॉर्म भरले नसतानाही त्यांना 'तुमचे फॉर्म पूर्ण झाले आहेत' असा मेसेज आला आहे.

- अनेक मतदारांनी सांगितले की ते कधीही BLO ला भेटले नाहीत, ना कुठल्याही कागदावर स्वाक्षरी केली. तरीही त्यांचे फॉर्म ऑनलाइन अपलोड झाले आहेत.

- खोटी स्वाक्षरी करून फॉर्म भरले जात असल्याचेही आरोप आहेत.

Election Commission On Bihar SIR : निवडणूक आयोगाची बाजू

निवड आयोगाने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झाली नाही. ही प्रक्रिया मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी आवश्यक आहे, जेणेकरून अयोग्य नावं हटवता येतील.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 28 जुलै 2025 रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. यापूर्वी 10 जुलै रोजी, न्यायमूर्ती सुधांशु धूलिया आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने सांगितले होते की, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड यांचा पुरावा म्हणून विचार होऊ शकतो.

What Is SIR Bihar : काय आहे SIR?

24 जून 2025 रोजी निवडणूक आयोगाने बिहारमध्ये Special Intensive Revision (SIR) सुरू केली. यामध्ये राज्यातील मतदारांची नामावली पूर्णपणे पुनर्तपासून तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व अपात्र मतदारांची नावे वगळणे, आढळून येणाऱ्या त्रुटी दूर करणे आणि मतदान प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करणे हा त्यामागे उद्देश असल्याचं सांगितलं जातंय.

निवडणूक आयोगाच्या पहिल्या प्राथमिक तपासणीत 52 लाखांहून अधिक मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत. यामध्ये मृत, स्थलांतरित किंवा दोन ठिकाणी मतदार असल्याच्या गोष्टींचा समावेश आहे.

Bihar Election Voter List : किती नावे वगळण्यात आली?

- अंदाजे 18-22 लाख जण मृत म्हणून नोंदणीकृत; त्यांच्या नावांची नोंद वगळण्यात आली आहे.

- सुमारे 26–35 लाख मतदार हे कायमस्वरूपी दुसर्‍या जिल्हा/राज्यात स्थलांतरित आहेत.

- सुमारे 7 लाख मतदार एका किंवा अनेक ठिकाणी नोंदणीकृत असल्याचे आढळले आहे.

- चुकीच्या नोंदींचा भाग असलेले अंदाजे 1 लाख मतदार हे शोधता येणारे नाहीत.

बिहारमधील SIR प्रक्रिया आता न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. जर आरोप खरे ठरले, तर मोठ्या प्रमाणावर मतदारांवर अन्याय झाला असल्याचे स्पष्ट होईल. एकीकडे निवडणूक आयोग पारदर्शकतेचा दावा करत आहे, तर दुसरीकडे नागरिक आणि राजकीय पक्ष या प्रक्रियेवर संशय व्यक्त करत आहेत.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget