Bihar liquor smuggling : बिहारसारख्या ड्राय राज्यात (Bihar liquor smuggling) दारू तस्करांच्या पद्धती देखील अनोख्या आहेत. कधी तेलाचे टँकर तर कधी आलिशान गाड्या दारू तस्करी (Illegal liquor trade in Bihar) करताना दिसून येतात. आता यापेक्षाही मोठे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने दारू तस्करी करण्यासाठी बुरखा वापरण्याचा एक अनोखा मार्ग शोधला. त्यामुळे फिरता दारु बार पाहून पोलिस सुद्धा चक्रावले. 

ती बुरख्याच्या वेषात दारूची तस्करी करत होती

कटिहारमध्ये उत्पादन शुल्क विभागाने बुरख्यात दारूची तस्करी (Liquor mafia Bihar) करणाऱ्या एका महिलेला पकडले. कटिहारमधील महिला दारू तस्करच्या पद्धत पाहून सर्वजण थक्क झाले. पश्चिम बंगालमधील कुमेदपूरमध्ये संध्या देवी नावाची एक महिला बुरखा घालून ट्रेनमध्ये प्रवास करत होती. कोणीतरी उत्पादन शुल्क विभागाला कळवले की महिला तस्कर नऊ लिटर परदेशी दारू घेऊन येत आहे. मानिया स्टेशनजवळ एका महिला कॉन्स्टेबलने महिला तस्कराला तिचा बुरखा काढण्यास सांगितले तेव्हा ती घाबरली.

अल्कोहोलचे टेट्रा पॅक टेपने बांधलेले होते

पोलिसांच्या कडक कारवाईनंतर जेव्हा महिलेने तिचा बुरखा काढला तेव्हा पोलिसही थक्क झाले. त्या महिलेने तिच्या साडीवर दारूचे टेट्रा पॅक टेपने बांधले होते. यानंतर तिने त्यावर बुरखा घातला. चौकशीदरम्यान महिलेने तिचे नाव संध्या आणि गाव माझेली सांगितले. पोलिसांनी संध्यादेवीला अटक केली आहे.

बिहारमध्ये दारू पूर्णपणे बंदी असताना दारूची तस्करी कशी होऊ शकते?

बिहारमध्ये बऱ्याच काळापासून दारूबंदी (Smuggling liquor in dry states) आहे. असे असूनही, दारूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटना दररोज नोंदवल्या जातात. आता एका महिलेला बुरख्याच्या आडून दारूची तस्करी (Alcohol smuggling racket Bihar) करताना पकडण्यात आले आहे, जेणेकरून कोणीही तिला पकडू नये. पण आता तिला पोलिसांनी पकडले आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या