पाटणा : नीट पेपर फुटीविरोधातील आंदोलनातील बिहार पोलिसांकडून बंदोबस्तावर असताना एके-47 चा वापर झाल्याचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला. विरोधक या मुद्यावरुन संसदेत देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर बिहार सरकारकडून नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनानंतर या प्रकरणी दाखल करण्यात आलेले सर्व मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तुरुंगात असलेल्या सर्वांना सोडलं जाईल, भविष्यात यासंदर्भात कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असा विश्वास बिहार सरकारकडून देण्यात आला आहे.  

Continues below advertisement

बिहार सरकार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार

सोमवारी सायंकाळी बिहार सरकारनं आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. बिहार सरकारकच्या गृह विभागाचे सचिव छत्रनील सिंह यांच्याकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे.  बिहारच्या गृहविभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार नीट यूजी पेपरफुटी विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारकडून 26 जुलैच्या सायंकाळी 6 पूर्वी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. आंदोलनातील सहभागी व्यक्तींविरोधात सरकार कोणत्याही प्रकारची दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करणार नाही, असं सांगण्यात आलं. 26 जुलैच्या सायंकाळी 6 वाजण्यापूर्वी ज्या केसेस दाखल झाल्या असतील त्या तात्काळ मागे घेण्याची कारवाई केली जाईल. या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तींना तातडीनं मुक्त केलं जाईल. 

26 जुलैच्या सायंकाळी 6 वाजण्यापूर्वी आंदोलनात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या व्यक्तींवर भविष्यात कारवाई केली जाणार नाही. बिहारच्या सम्राट चौधरी यांच्या सरकारच्या नव्या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. 

Continues below advertisement

बिहारमध्ये 355 लोक तुरुंगात

नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन केल्याबद्दल जवळपास 355 लोकांना तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. ही आकडेवारी पोलीस मुख्यालयांकडून जारी करण्यात आली आहे. या आंदोलनात लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि तेजस्वी यादव यांचा भाऊ तेज प्रताप यादव यांना अटक करण्यात आली आहे. ते जनशक्ती जनता दलाचे प्रमुख आहेत.