नवी दिल्ली : आज बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 12.30 वाजता दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. विधानसभेच्या 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तारखा घोषित होणार आहेत. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.


बिहार विधानसभेत सोबत आज मध्यप्रदेश मधल्या पोटनिवडणुकाही जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडानंतर जवळपास 27 जागांवर निवडणुका अपेक्षित आहेत. मध्यप्रदेशसाठी ही मिनी विधानसभा असणार आहे.


तीन ते चार टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता
माहितीनुसार, यावेळी तीन ते चार टप्प्यात बिहारच्या विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. 2015 मध्ये या निवडणुका पाच टप्प्यात झाल्या होत्या. गेल्यावेळी निवडणुकांमध्ये 72 हजार पोलिंग बूथ होते, मात्र यावेळी निवडणूक आयोगाने जवळपास एक लाख सहा हजार बूथ बनवण्याची तयारी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आयोगाला पूर्ण काळजी घेऊन या निवडणुका पार पाडायच्या आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी एक लाख 80 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

बिहार विधानसभेतील बलाबल (एकूण 243 जागा)


एनडीए- 125
आरजेडी- 80
आयएनसी- 26
सीपीआय- 3
एचएएम- 1
एमआयएम- 1
आयएनडी- 5
रिक्त- 2


पक्षनिहाय बलाबल


आरजेडी- 80


जेडीयू- 71


भाजप- 53


काँग्रेस- 27


LNJP- 2


RLSP-2


HAM-1


अपक्ष- 4