Bihar election 2025: बिहारमध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक जवळ येत असताना, राजकीय हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. बिहारमध्ये विशेष गहन सुधारणा (SIR) आणि मतदार यादीतून नावे वगळण्याच्या वादात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल धी यांनी व्होटर अधिकार यात्रा सुरु केली आहे. याच काळात, सी-व्होटरने एक नवीन सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये जनतेमध्ये कोणत्या नेत्याची लोकप्रियता वाढत आहे आणि कोण मागे आहे हे सांगितले आहे. सर्वेक्षणानुसार, ही निवडणूक NDA विरुद्ध इंडिया आघाडी तसेच स्वतंत्र चेहरा असलेल्या प्रशांत किशोर यांच्यासाठी एक मोठी संधी ठरू शकते. मतदार यादी वाद आणि SIR मुळे बिहार निवडणूक रंजक बनली आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव देखील मतदार हक्क यात्रेद्वारे जनतेशी सतत संवाद साधत आहेत. अशा परिस्थितीत, जनता मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहू इच्छिते यासाठी सी-व्होटरने फेब्रुवारी, जून आणि ऑगस्ट 2025 मध्ये तीन वेगवेगळे सर्वेक्षण केले. 

सी-व्होटर सर्वेक्षण नितीश कुमार आणि एनडीएचे चेहरे

नीतीश कुमार हे बऱ्याच काळापासून बिहारच्या राजकारणातील एक मोठा चेहरा आहेत, परंतु सी-व्होटर सर्वेक्षणातून असे दिसून येते की त्यांची लोकप्रियता सतत कमी होत आहे. फेब्रुवारीमध्ये18 टक्के लोक त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पसंत करत होते. परंतु ऑगस्टपर्यंत तो 15 टक्क्यांपर्यंत खाली आला. एनडीएचे इतर चेहरे म्हणजे चिराग पासवान आणि सम्राट चौधरी. चिराग पासवान फेब्रुवारीमध्ये 4 टक्के होते. जूनमध्ये अचानक 11 टक्क्यांवर पोहोचले, परंतु ऑगस्टमध्ये ते एक टक्क्याने खाली आले. सम्राट चौधरी फेब्रुवारीमध्ये 8 टक्के, जूनमध्ये 7 टक्के आणि ऑगस्टमध्ये 10 टक्के होते. याचा अर्थ असा की सध्या एनडीएमध्ये कोणताही मोठा चेहरा नितीश कुमार यांची जागा घेऊ शकलेला नाही.

तेजस्वी यादव जनतेची पहिली पसंती आहेत का?

तेजस्वी यादव हे इंडिया अलायन्सकडून सर्वात मोठे दावेदार मानले जातात. सर्वेक्षणाच्या तिन्ही टप्प्यात ते नंबर वन राहिले आहेत. फेब्रुवारीमध्ये 41 टक्के, जूनमध्ये 37 टक्के आणि ऑगस्टमध्ये 31 टक्के. अशाप्रकारे, त्यांची लोकप्रियता कमी होत आहे, परंतु असे असूनही, ते नितीश कुमार, चिराग पासवान आणि सम्राट चौधरी यांना मागे टाकत आहेत. या आकडेवारीवरून असे दिसून येते की आलेख थोडा खाली आला असला तरी जनता अजूनही तेजस्वी यादव यांच्याकडे झुकत आहे.

प्रशांत किशोर किंगमेकर ठरतील?

प्रशांत किशोरही चर्चेत आहेत. फेब्रुवारीमध्ये त्यांना 15 टक्के मते मिळाली, जूनमध्ये हा आकडा 16 पर्यंत वाढला आणि ऑगस्टमध्ये 6 टक्क्यांच्या वाढीसह 22 वर पोहोचला. म्हणजेच त्यांची लोकप्रियता सतत वाढत आहे. जर ही गती अशीच राहिली तर नोव्हेंबरपर्यंत ते एक मोठे आव्हान बनू शकतात. ते कोणत्याही युतीशी संबंधित नसल्यामुळे, प्रश्न उद्भवतो की ते किंगमेकर बनतील की स्वतः राजा बनण्याचा प्रयत्न करतील.

निवडणूक आयोग आणि राहुल गांधी यांच्यातील वाद

या निवडणुकीच्या वातावरणात, राहुल गांधी यांनी मतदार यादीतून नावे वगळण्यावर आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. एका सर्वेक्षणात, 59 टक्के लोकांना राहुल गांधी यांचे आरोप खरे असल्याचे वाटले. त्याच वेळी, 67 टक्के लोकांनी म्हटले की निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. हा मुद्दा थेट मतदारांवर परिणाम करू शकतो आणि निवडणूक समीकरण बदलू शकतो.

इतर महत्वाच्या बातम्या