पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी पहिल्या टप्प्यात म्हणजेच 6 नोव्हेंबरला 121 जागांवर मतदान पार पडेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 122 जागांवर मतदान 11 नोव्हेंबरला होणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महिलांच्या मतदानाचा प्रभाव दिसून आला होता. त्यामुळं बिहारमध्ये महिलांची मत आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरु आहे. दोन्ही आघाड्या महिलांनी आपल्या उमेदवारांना मतदान करावं म्हणून प्रयत्न करत आहेत. मात्र, महिलांना उमेदवारी देण्याबाबत दोन्ही आघाड्यांनी दिलेली संख्या जाणून घेणार आहोत.
Bihar Election 2025 : बिहारमध्ये महिलांना उमेदवारी देण्यात कोणता पक्ष आघाडीवर?
लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष महागठबंधनमध्ये 143 जागा लढवत आहे. त्यांनी 143 पैकी 24 जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे. म्हणजेच ही टक्केवारी 16 टक्के आहे. मोहनियातील राजदच्या महिला उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे.
काँग्रेसनं 61 जागांवर उमेदवार दिले आहेत. काही ठिकाणी महागठबंधनमध्ये मैत्रीपूर्ण लढतींची शक्यता आहे. काँग्रेसनं 5 महिलांना उमेदवारी दिली आहे. म्हणजे काँग्रेसनं 8 टक्के महिलांना उमेदवारी दिली.
एनडीएमध्ये भाजप आणि जदयू 101-101 जागा लढवत आहेत. दोन्ही पक्षांनी महिलांना 13-13 जागांवर उमेदवारी दिली आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलम पक्षानं 6 महिलांना उमेदवारी दिली आहे.
जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चा पक्षानं 6 जागांपैकी 2 जागांवर महिलांना उमेदवारी दिली. त्या जीतनराम मांझी यांच्या नातेवाईक आहेत. बिहारमध्ये 243 जागांपैकी एनडीएनं 35 जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे. तर, महागठबंधनमध्ये राजद आणि काँग्रेसनं 204 जागांपैकी 29 महिलांना उमेदवारी दिली आहे. कोणत्याही आघाडीनं 33 टक्क्यांचं आरक्षण धोरण लागू केलं नाही.
महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
बिहारमधील नितीशकुमार यांच्या सरकारनं महिलांसाठी काही योजना सुरु केल्या आहेत. नितीशकुमार सरकारनं मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरु केली आहे. ज्यानुसार 1.21 कोटी महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. एनडीएन सरकारनं अंगणवाडी सेविका आणि इतरांचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजद प्रमुख तेजस्वी यादव यांनी काही घोषणा केल्या आहेत. बिहारच्या प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन तेजस्वी यादव यांनी दिलं आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, 14 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.