Continues below advertisement


Bihar Election 2025 Dates : अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Election Commission) प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी बिहारच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. बिहारच्या निवडणुका या दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान हे 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.  



Bihar Election Dates : बिहार निवडणूक दोन टप्प्यात


पहिल्या टप्प्यातील निवडणूक ही 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 10 ऑक्टोबर आणि 13 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.


बिहार निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 17 ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि 20 ऑक्टोबर (दुसरा टप्पा) असेल.


अर्जांची छाननी ही 18 ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि 21 ऑक्टोबर (दुसरा टप्पा) रोजी होणार.


अर्ज मागे घेण्याची मुदत ही 20 ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि 23 ऑक्टोबर (दुसरा टप्पा) असेल.


मतदान -


पहिला टप्पा - 6 नोव्हेबर


दुसरा टप्पा - 11 नोव्हेंबर


Bihar Election Result Date : निवडणुकीचा निकाल - 14 नोव्हेंबर



बिहारमध्ये आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्याचसोबत सर्व निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि इतर सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.



Bihar Total Voter : पुरुष आणि किती महिला मतदारांची संख्या किती?


निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, "यावेळी बिहारच्या निवडणुका सुरळीत आणि सोप्या पद्धतीने होतील. निवडणुकीसाठी आम्ही बिहारच्या जनतेचे सहकार्य अपेक्षित करतो. बिहारमध्ये एकूण 7 कोटी 42 लाख मतदार आहेत. त्यापैकी 3 कोटी 92 लाख पुरुष आणि 3 कोटी 50 लाख महिला मतदार आहेत. 14 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करतील. प्रत्येक मतदान केंद्रावर 1,200 मतदार असतील."


Bihar Voting Process : निवडणुकीच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे नोंदवता येतील


निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, "मतदानाच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे नोंदवता येतील. एसआयआरच्या माध्यमातून अंतिम यादी 30 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल."




Bihar Election 2025 Date : फेक न्यूज विरोधात कारवाईचा इशारा


निवडणुकीच्या काळातील फेक न्यूजवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ज्ञानेश कुमार यांनी दिला. सर्व मतदान केंद्रांवर हिंसाचारावर शून्य सहनशीलतेचे (Zero Tolerance) निर्देश देण्यात आले आहेत. सर्व अधिकारी निष्पक्षपणे काम करतील.


वृद्ध मतदारांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअर उपलब्ध असतील. सर्व मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रिया थेट प्रक्षेपित केली जाईल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.