Bihar CM Nitish Kumar Networth : नितीशकुमार (Nitishkumar) यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी (Bihar CM) 9 व्या वेळेस शपथ घेतली. आरजेडीसोबत फारकत घेत नितीशकुमार यांनी भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केलेय. बिहारमध्ये (Bihar Deputy CMs) भाजपच्या दोन नेत्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. सम्राट चौधरी (Samrat Choudhary) आणि विजय सिन्हा (Vijay Sinha) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नवव्यांदा मुख्यमंत्री झालेल्या नितीशकुमार यांची संपत्ती किती आहे? याबाबत जाणून घेऊयात...
प्रत्येकवर्षी संपत्तीची माहिती देतात नितीशकुमार -
नितीशकुमार प्रत्येकवर्षी आपल्या संपत्तीचा लेखाजोखा सार्वजनिकपणे देतात. त्यांच्यासोबत बिहार राज्याच्या संकेतस्थळावर त्यांच्या पक्षातील नेतेही आपली नेटवर्थ शेअर करतात. 31 डिसेंबर 2023 रोजी नितीशकुमार यांनी आपल्या संपत्तीविषयी माहिती दिली आहे.
बँक खात्यात 49000 हजार रुपये -
लागोपाठ नवव्यावर्षी बिहारच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेणाऱ्या नितीशकुमार यांची नेटवर्थ (Nitish Kumar Networth) 1.64 कोटी रुपये आहे. यामध्ये स्थावर आणि जंगम संपत्तीचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसा, नितीशकुमार यांच्याकडे 22 हजार 552 रुपयांची रोकड आहे. त्यांच्या बँक खात्यात 49202 रुपये जमा आहेत. नितीश कुमार यांच्याकडे 13 गायी, 13 वासरे आहेत, त्याची एकूण किंमत 1.45 लाख रुपये इतकी सांगण्यात आली आहे.
एक कार अन् दिल्लीमध्ये फ्लॅट -
नीतीशकुमार यांच्याकडे असणाऱ्या अन्य संपत्तीमध्ये फोर्ड इकोस्पोर्ट्स कारचा समावेश आहे. या कारची किंमत 11.32 लाख रुपये इतकी आहे. नितीशकुमार यांच्याकडे 1.28 लाख रुपयांची ज्वेलरी आहे. दोन सोन्याच्या अंगठ्या आणि एक चांदीची आंगठीचा यामध्ये समावेश आहे. नितीशकुमार यांच्याकडे स्थावर संपत्तीमध्ये राजधानी दिल्लीमध्ये एक फ्लॅट आहे. दिल्लीच्या द्वारकामध्ये त्यांच्या नावावर फ्लॅट आहे. या अपार्टमेंटची किंमत 1.48 कोटी रुपये इतकी आहे. नितीशकुमार यांनी 2004 मध्ये तो खरेदी केला होता, त्यावेळी त्याची किंमत 13.78 लाख रुपये इतकी होती.
मुलाकडे पाच पट जास्त संपत्ती -
नितीशकुमार यांच्यापेक्षा त्यांच्या मुलाकडे पाच पट जास्त संपत्ती आहे. 2022 च्या एका रिपोर्टनुसार, निशांत यांच्याकडे नितीशकुमार यांच्यापेक्षा पाचपट जास्त संपत्ती आहे. निशांतकडे 16549 रुपये रोकड आहे. 1.28 कोटींची एफडी आहे. त्याशिवाय 1.63 कोटींची जंगम संपत्ती आहे. तर 1.98 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. निशांत यांच्याकडे नालंदा आणि पाटनामध्ये फ्लॅट आहे. त्यासोबत शेतीही आहे.
आणखी वाचा :