Continues below advertisement

Bihar Assembly Election 2025 : बिहार निवडणुकीसंबंधी राजकीय हालचाली गतीमान झाल्या असून भाजपप्रणित एनडीएने जागावाटप जाहीर करून आघाडी घेतल्याचं चित्र आहे. त्यामध्ये भाजप आणि नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल प्रत्येकी 101 जागा लढणार आहेत. त्यावरूनच खासदार पप्पू यादव यांनी टीका केली आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) आता संपले असून निकालानंतर त्यांना आमच्याकडे यावे लागेल असं ते म्हणाले. भाजप फक्त 101 नव्हे तर सहयोगी पक्षांसह 142 हून जास्त जागांवर लढत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Bihar Assembly Election : नितीश कुमार यांची ताकद कमी केली

पप्पू यादव म्हणाले की, “NDA मध्ये जागा वाटप झाले आहे. या जागा वाटपानंतरितीश कुमार संपले आहेत. भारतीय जनता पक्ष (BJP) आपल्या सहयोगी मित्रांसह 142 जागांवर निवडणूक लढवत आहे.

Continues below advertisement

तर जनता दल युनायटेड (JDU) फक्त 101 जागांपुरती मर्यादित राहिले आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना आमच्याकडे यावेच लागेल. त्यांना काहीच पर्याय नाही."

पप्पू यादव म्हणाले की, भाजपने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी छोटे पक्ष कमी करून आपली सत्ता मजबूत करण्याचा खेळ केला आहे. जेडीयूला केवळ 101 जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नितीश कुमार यांची ताकद कमी झाली आहे.

Nitish Kumar : नितीश कुमारांचा पक्ष भाजप संपवणार

निवडणुकीनंतर नितीश कुमार आपला पक्ष विलीन करतील का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पप्पू यादव म्हणाले की, संयुक्त जनता दल हा पक्ष विलीन होणार नाही, त्याला भाजप संपवेल.

आरजेडी (RJD) नेते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, NDA मध्ये सर्वकाही सुरळीत नाही. “भाजपने जेडीयूला आता समान पातळीवर आणले आहे. चिराग पासवान आणि भाजपने मिळून 130 जागा मिळवल्या आहेत. निवडणुकीनंतर भाजप जेडीयूची ताकद कमी करून मुख्यमंत्रिपद स्वतःकडे ठेवेल.

जीतन राम मांझी यांनी 15 जागा मागितल्या, परंतु त्यांना फक्त 6 जागा मिळाल्या. उपेंद्र कुशवाहा यांनी सुद्धा जास्त मागणी केली, पण त्यांची स्थितीही समान आहे. पप्पू यादव म्हणाले की, भाजपने लहान पक्षांवर प्रभुत्व साधण्याचा रणनीती आखल आहे.

NDA Seat Distribution Details : जागावाटपाचा तपशील

भाजप (BJP) – 101 जागा

जदयू (JDU) – 101 जागा

लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) (LJP-Ram Vilas) – 29 जागा

राष्ट्रीय लोक मोर्चा (RALOMO) – 6 जागा

हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM) – 6 जागा

ही बातमी वाचा: