1 September Historical Events : आज सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस आहे. प्रत्येक दिवसाला इतिहास असतो. रोज वेगवेगळ्या गोष्टा समाजात घडत असतात. पण आजचा दिवस हा खास आहे. इतिहास पाहिला तर आजच्या दिवशी बऱ्याच खास गोष्टी घडल्या आहेत, असं लक्षात येतं. 1 सप्टेंबर रोजी इतिहासात कोणत्या गोष्टी घडल्या, त्याबद्दल जाणून घेऊयात....


भारतीय आयुर्विमा महामंडळाचा स्थापना दिवस
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलएयसी (LIC) हे असे नाव देशातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला माहित असेल. ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ही त्यांची टॅगलाईन अनेकांना माहित आहे. स्वातंत्र्यानंतर 9 वर्षांनी म्हणजेच 1 सप्टेंबर 1956 रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. 


01 सप्टेंबर रोजी घडलेल्या इतर काही ऐतिहासिक गोष्टी जाणून घेऊयात...
ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांची शेवटची बैठक लंडनमधील ईस्ट इंडिया हाऊसमध्ये 1 सप्टेंबर 1858 रोजी झाली.
1 सप्टेंबर 1878 रोजी एम्मा एम. नट या अमेरिकेतील पहिल्या महिला टेलिफोन ऑपरेटर बनल्या.
-प्रसिद्ध साहित्यिक आणि शब्दकोशाची निर्मिती करणाऱ्या लेखक फादर कामिल बुल्के यांचा जन्म 1 सप्टेंबर 1909 मध्ये झाला. 1974 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. 
-1923 मध्ये ग्रेट कांट भूकंपाने जपानमधील टोकियो आणि योकोहामा शहरांमध्ये मोठा विध्वंस केला.
-रासबिहारी बोस यांनी 1 सप्टेंबर 1942 रोजी भारतीय राष्ट्रीय लष्कराची स्थापना केली.
-भारतीय प्रमाणवेळेची सुरुवात 1 सप्टेंबरला 1947 रोजी झाली. 
-इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची स्थापना 1 सप्टेंबर 1964 रोजी इंडियन ऑइल रिफायनरी आणि इंडियन ऑइल कंपनीचे विलीनीकरण करून झाली.
-चीनने 1 सप्टेंबर 2000 तिबेटमार्गे नेपाळला जाणारा आपला एकमेव मार्ग बंद केला.
- 1 सप्टेंबर 2018 रोजी बॉक्सर अमित पंघल जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो एकूण आठवा भारतीय बॉक्सर ठरला.
-1 सप्टेंबर 2018  रोजी प्रणव बर्धन आणि शिबनाथ सरकार यांनी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या ब्रिज स्पर्धेत दुहेरीत सुवर्णपदक जिंकले.
-भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर 1 सप्टेंबर 2020 रोजी दिल्लीत पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. 31 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: