एक्स्प्लोर
भारत सरकारचा मोठा निर्णय, काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली
जम्मू काश्मीरमधील आधिकाऱ्याने सांगितले की, मीरवाइज उमर फारूक आणि अन्य चार नेत्यासह इतर फुटीरतावादी नेत्यांना यापुढे कोणतीही सुरक्षा दिली जाणार नाही. शिवाय त्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी गाड्याही काढून घेतल्या जाणार आहेत.

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दहशतवाद्यांना रसद पोहचविणाऱ्या आणि आयएसआयशी संपर्कात असलेल्या फुटीरतावादी नेत्यांना जम्मू-काश्मीर सरकारने जोरदार दणका दिला आहे. हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा केला होता. त्यात त्यांनी पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
हा निर्णय घेतल्यामुळे मीरवाइज उमर फारूक, शब्बीर शाह, हाशिम कुरैशी, बिलाल लोन आणि अब्दुल गनी बट या फुटीरतावादी नेत्यांना सुरक्षा मिळणार नाही. या नेत्यांना जम्मू काश्मीर पोलिसांनी सुरक्षा दिली होती. मात्र आता या निर्णयामुळे फुटीरवादी नेत्यांना जोरदार दणका मानला जात आहे.
जम्मू काश्मीरमधील आधिकाऱ्याने सांगितले की, मीरवाइज उमर फारूक आणि अन्य चार नेत्यासह इतर फुटीरतावादी नेत्यांना यापुढे कोणतीही सुरक्षा दिली जाणार नाही. शिवाय त्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी गाड्याही काढून घेतल्या जाणार आहेत.
पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थाशी (आयएसआय) संपर्क ठेवणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेची समिक्षा केली जाईल, असे पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीर भेटीवर गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले होते. केंद्र सरकारच्या सल्ल्यानंतर आयएसआयशी संपर्क करत असलेल्याच्या ज्या फुटीरतावादी नेत्यावर संशय आहे अशा नेत्यांच्या सुरक्षाची समिक्षा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे एका आधिकाऱ्याने सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
