Bengaluru Traffic News : कर्नाटकची (Karnataka) राजधानी बंगळुरु (Bengaluru) मध्ये मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam) पाहायला मिळाली. बुधवारी बंगळुरुमध्ये झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमध्ये लोक अनेक तास अडकून पडले होते. ही वाहतूक कोंडी इतकी मोठी होती की, सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेले विद्यार्थी थेट रात्री घरी परतले. बंगळुरुमधील वाहतूक कोंडी कायमच चर्चेचा विषय ठरते. मात्र, बुधवारी झालेल्या वाहतूक कोंडीने नवा उच्चांक गाठला असं म्हणावं लागेल. 27 सप्टेंबरला बंगळुरुमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. 


बंगळुरुमध्ये मोठी वाहतूक कोंडी


बंगळुरूमधील या वाहतूक कोंडीचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बुधवारी बंगळुरुच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गाड्यांची गर्दी पाहायला मिळाली. शहरांतील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी ही वाहनांना दोन तास वेळ लागली. सकाळी शाळेत गेलेली मुले रात्री 8-9 वाजेच्या सुमारास घरी पोहोचली. शहराबाहेरील रिंग रोडवर लोक पाच ते सहा तास वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते.


रस्त्यावर सर्वत्र गाड्यांचा आवाज, धूर


बंगळुरुच्या बाहेरील रिंग रोड, मराठाहल्ली, सरजापूर आणि सिल्कबोर्ड येथील परिसरात या वाहतूक कोंडीचा मोठा परिणाम दिसून आहे. अनेक वाहनांच्या लांबच लांब रांगा या रस्त्यांवर लागल्या होत्या. रस्त्यावर सर्वत्र गाड्यांचा आवाज, धूर असंच चित्र बुधवारी बंगळुरुमध्ये पाहायला मिळालं. अनेकांना या वाहतूक कोंडीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेकांनी त्यांच्या अडचणी आणि झालेला त्रास सोशल मीडियावर व्यक्त केला.


पाहा सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ






वाहतूक कोंडीचं कारण काय?


28 ऑक्टोबरपासून 5 दिवसांची लांब सुट्टी (Long Weekend) आला आहे. यामुळे बेंगळुरूमधून सुट्टी घालवण्यासाठी बाहेर पडले होते, त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. तर, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यानेही वाहतूक कोंडी झाली. काहींनी या ट्रॅफिक जॅममध्ये भूक लागल्यावर जवळच्या दुकानातून पिझ्झा मागवून गाडीत बसून खाल्ला. 


वाहनधारकांनासह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास


या वाहतूक कोंडीमुळे फक्त वाहनधारकांनाच नाही तर पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. मोठ्या प्रमाणात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांनी फुटपाथवरूनही गाड्या नेल्या. यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याच्या कडेने चालण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती. बुधवारी बंगळुरुमध्ये सामान्यपेक्षा दुप्पट प्रमाणात वाहने रस्त्यावर पाहायला मिळाली. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर साधारणपणे दोन लाख असणाऱ्या वाहनांची संख्या बुधवारी संध्याकाळी साडेतीन लाखांपर्यंत पोहोचली होती.


महत्वाच्या इतर बातम्या :


Ayodhya Ram Mandir : 'या' मुहूर्तावर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, एका दिवशी 75 हजार भाविकांना दर्शन मिळणार; अयोध्या नगरी सज्ज