बंगळुरू : देशात अनेक भागातील वातावरणात अचानक बदल (Weather Update) झाला आहे. ऐन उन्हाळ्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी (Unseaonal Rain) पाहायला मिळत आहे. बंगळुरूमध्येही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD), बुधवारी बंगळुरूसाठी मुसळधार पावसामुळे यलो अलर्ट जारी केला आहे. बंगळुरूमध्ये हवाान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जोरदार वादळी वाऱ्यासह अनेक भागात पावसाची शक्यता आहे.


बंगळुरुमध्ये मुसळधार पावसाची हजेरी


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बुधवारी सकाळपासूनच बंगळुरुमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शहरातच्या अनेक भागात पाणी साचले होते. अनेक भागात पाणी साचल्याने बंगळुरू ट्रॅफिक पोलिसांनी रहदारीमधील अडथळा दूर करत नागरिकांना सूचना दिल्या. यामुळे वाहतुकदारांना दिलासा मिळाला.


पुढील दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारा


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगळुरुमध्ये पुढील दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत शहरातील कमाल आणि किमान तापमान 35 अंश सेल्सिअस आणि 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.


आयएमडीकडून यलो अलर्ट जारी


भारतीय हवामान विभागने (IMD)  24 तासासाठी बंगळुरुला यलो अलर्ट जारी केला आहे, संभाव्य मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, आयटी हब बंगळुरुमध्ये पुढील सात दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगळुरूच्या हवामान अंदाजानुसार पुढील काही दिवस ढगाळ आकाश आणि पाऊस असं चित्र दिसेल. आठवडाभर सामान्यतः ढगाळ आकाश आणि काही प्रमाणात पाऊस आणि विजांचा गडगडाट अपेक्षित आहे.


बंगळुरूमध्ये आठवडाभर पावसाचा अंदाज


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 8 मे रोजी तापमान 21 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान दिसेल. 9 मे रोजी तापमान 22 ते 36 अंश सेल्सिअस आणि सामान्यतः ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. 10 मे ते 13 मे पर्यंत तापमान 23 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, सामान्यतः ढगाळ आकाश आणि हलका पाऊस अपेक्षित आहे. 12 आणि 13 मे रोजी अंशतः ढगाळ आकाशाखाली पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, बंगळुरूच्या नागरिकांना संपूर्ण आठवडाभर पावसाची रिमझिम पाहायला मिळणार आहे.


मे महिन्याच्या सुरुवातीपासून बंगळुरुमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे आणि परिणामी तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला तापमान 38 अंश सेल्सिअसवरून मंगळवारी शहराचे तापमान 33.8 अंश सेल्सिअसवर आले. त्यामुळे तापमानात मोठी घट झाली असल्याचं दिसून येत आहे. 7 मे हा महिनाभरातील सर्वात थंड दिवस म्हणून नोंदवला गेला आहे.