Pulwama Case NIA: पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
Pulwama Case NIA: मानवतावादी दृष्टिकोनातून त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्नात सहभागी होण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे.

दिल्ली : दिल्ली NIA न्यायालयाने पुलवामा प्रकरणातील आरोपी मोहम्मद इक्बाल राथरला अंतरिम जामीन (Pulwama Case NIA) नाकारला असल्याची माहिती समोर आली आहे. बहिणीच्या लग्नासाठी ५ ते १० सप्टेंबरदरम्यान १० दिवसांची तात्पुरता जामीन राथरने मागितली होती. मात्र राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा न्यायालयाने महत्त्वाचा मानला जात आहे. आरोपीच्या वैयक्तिक इच्छेपेक्षा सुरक्षेच्या चिंतेला प्राधान्य देण्यात येत असल्याचं कोर्टाने मानलं आहे. त्यामुळे राथरला प्रत्यक्ष लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली नाही. मात्र मानवतावादी दृष्टिकोनातून त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्नात सहभागी होण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. (Pulwama Case NIA)
NIA: बहिणीच्या लग्नासाठी केला होता जामीन अर्ज
मोहम्मद इक्बाल राथरने बहिणीच्या लग्नासाठी ५ ते १० सप्टेंबरदरम्यान १० दिवसांची तात्पुरता जामीन राथरने मागितली होती. मात्र राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा न्यायालयाने महत्त्वाचा मानला जात आहे. आरोपीच्या वैयक्तिक इच्छेपेक्षा सुरक्षेच्या चिंतेला प्राधान्य देण्यात येत असल्याचं कोर्टाने मानलं आहे. त्यामुळे राथरला प्रत्यक्ष लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली नाही. मात्र मानवतावादी दृष्टिकोनातून त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्नात सहभागी होण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. (Pulwama Case NIA)
Pulwama terror attack: फारूकने भारतात घुसखोरी केल्यावर सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी...
फेब्रुवारी २०१९ मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मोहम्मद उमर फारूक याला मदत करणाऱ्या मुझम्मिल इक्बाल राथर याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सहावा आरोपी म्हणून अटक केली होती. इक्बाल राथर हा जम्मू-काश्मीरमधील बडगाम (चरार-ए-शरीफ, फुटलीपुरा) येथील रहिवासी आहे. एप्रिल २०१८ मध्ये उमर फारूकने भारतात घुसखोरी केल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी इक्बालने मदत केली होती. पुलवामा प्रकरणात झालेली ही सहावी अटक होती. उमर फारूक यानेच पुलवामा हल्ल्यात वापरलेले आयईडी (IED) वाहन तयार केले होते. २९ मार्च २०१९ रोजी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत उमर फारूक आणि कामरान हे दोघे मारले गेले होते. २५ वर्षीय इक्बाल राथर हा पाकिस्तानमधील 'जैश-ए-मोहम्मद'च्या वरिष्ठ नेत्यांच्या थेट संपर्कात होता आणि मेसेजिंग ॲप्सद्वारे त्यांच्याशी संवाद साधत होता. सप्टेंबर २०१८ मधील झाज्जर-कोटली चकमक प्रकरणात तो आधीच न्यायालयीन कोठडीत होता.
आणखी वाचा - देव तारी त्याला कोण मारी! ना अन्न ना पाणी, तब्बल 9 दिवस मृत्यूशी झुंज, महापुरात अडकलेल्या 2 जणांची सुटका
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















