Badrinath Temple Controversy : एकीकडे अयोध्येच्या राम मंदिरातील देणगीची चोरी करण्यात आल्याची बातमी गाजत असताना आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवरही डल्ला मारल्याची माहिती आहे. भारतातील अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या उत्तराखंडमधील श्री बद्रीनाथ मंदिराच्या (Badrinath Temple) देणगी चोरी प्रकरणावरून सध्या देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) शिस्त आणि प्रशासकीय पारदर्शकता राखण्याच्या दृष्टीने एक अत्यंत मोठी आणि कडक कारवाई केली आहे. मंदिर समितीच्या अध्यक्षांच्या कार्यालयात कार्यरत असलेला खासगी सचिव प्रमोद नौटियाल याला तात्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित (Suspended) करण्यात आलं आहे.
प्रमोद नौटियाल यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून चढावा आणि आर्थिक व्यवहारात गंभीर अनियमितता केल्याचा प्राथमिक आरोप ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे मंदिर प्रशासनाशी संबंधित इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
BKTC Action On Pramod Nautiyal : चौकशीत आरोप सिद्ध
बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, खासगी सचिव प्रमोद नौटियाल याच्याविरुद्ध कर्तव्यात कसूर केल्याचे आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप समोर आले होते. या पार्श्वभूमीवर 3 जुलै रोजी त्यांना प्रशासनाकडून 'कारणे दाखवा' (Show Cause Notice) नोटीस बजावण्यात आली होती. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या निष्पक्ष आणि सखोल चौकशीसाठी मंदिर समितीने तातडीने चार सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली होती.
चौकशी समितीने दिलेल्या प्राथमिक अहवालाचे आणि प्रमोद नौटियाल यांनी सादर केलेल्या स्पष्टीकरणाचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. यामध्ये नौटियाल यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहेत.
Badrinath Kedarnath Temple News : चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून कारवाई
चौकशी समितीने आपल्या अहवालात संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कडक शिस्तभंगविषयक कारवाई करण्याची शिफारस केली होती. तसेच, प्रमोद नौटियाल हा जर सध्याच्या पदावर म्हणजेच अध्यक्षांच्या खासगी सचिव पदावर कायम राहिला, तर तो आपल्या प्रभावाचा वापर करून चालू असलेल्या चौकशीवर आणि पुराव्यांवर परिणाम करू शकतो, अशी भीतीही समितीने व्यक्त केली होती.
हेच सर्व तथ्य लक्षात घेऊन चौकशीत पूर्ण पारदर्शकता आणि निष्पक्षता राहावी या उद्देशाने मंदिर प्रशासनाने त्याला तात्काळ निलंबित केले आहे. निलंबनाच्या काळात त्याला बीकेटीसीचे मुख्य कार्यालय, ज्योतिर्मठ (जिल्हा चमोली) येथे संलग्न (Attached) करण्यात आलं आहे. मंदिर समितीने स्पष्ट केले आहे की, देवस्थान प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य असून कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा चोरी खपवून घेतली जाणार नाही आणि नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल.
ही बातमी वाचा:
