Baba Ramdev News : सरकारी नोकऱ्या आणि त्यामधील अनियमीतता यावरुन पतंजली समूहाचे प्रमुख योगगुरु बाबा रामदेव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्यावरुन त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप बाबा रामदेव यांनी केला आहे. जर ही परिस्थिती सुधारली नाहीतर मी पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इसारा त्यांनी दिला आहे. 

Continues below advertisement

सरकारी नोकरीच्या मुलाखतींमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी 

बाबा रामदेव यांनी सरकारी नोकऱ्यांमधील कथित घोटाळ्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.  सरकारी नोकरीच्या मुलाखतींमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एका विशिष्ट जाती, वर्ग किंवा संघटनेतील लोकांना झुकते माप दिले जाते, तर इतरांना वगळले जाते असा आरोप देखील बाबा रामदेव यांनी केला आहे. 

भरती प्रक्रियेतील मुलाखतींमध्ये लाचखोरी आणि शिफारशीच्या तक्रारी 

आज देशाचा 80 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केल्यानंतर बाबा रामदेव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. भरती प्रक्रियेतील मुलाखतींमध्ये लाचखोरी आणि शिफारशीच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमधील सुविधांच्या कमतरतेचा मुद्दाही देखील यावेळी उपस्थित केला.

Continues below advertisement

शाळा आणि महाविद्यालयांमधील मुले वीज, पाणी आणि पुस्तकांच्या कमतरतेबद्दल तक्रार

दरम्यान, जर या सरकारी नोकऱ्यांमधील व्यवस्थेत सुधारणा झाली नाही, तर आंदोलन सुरु करणार असल्याचे बाबा रामदेव म्हणाले. मी अराजकतेचं समर्थन करणार नाही. पण देशातील समस्यांवर तोडगा काढण्याची गरज असल्याचे बाबा रामेदव यांनी सांगितले. बाबा रामदेव म्हणाले की, देशात मोठ्या प्रमाणावर अशांतता आहे. शाळा आणि महाविद्यालयांमधील मुले वीज, पाणी आणि पुस्तकांच्या कमतरतेबद्दल तक्रार करत आहेत. परीक्षेत उत्तीर्ण होऊनही, त्यांच्या दहावी आणि बारावीच्या गुणांना महत्त्व दिले जात नाही. निवड स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून केली जाते. 90 ते 99 टक्के सरकारी नोकरीच्या मुलाखतींमध्ये हेराफेरी केली जात असल्याचा गंबीर आरोप बाबा रामेदव यांनी केला आहे. 

देशात खूप भ्रष्टाचार 

स्वतःच्या गटातील, जातीतील आणि वर्गातील लोकांना नोकरीवर ठेवले जाते, तर इतरांना वगळले जाते. हे न्यायाच्या विरोधात आहे. मुलाखतीदरम्यान पैसे आणि लाच घेऊन भरती केली जाते. जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर देशात आंदोलन होईल. मी आंदोलन किंवा अराजकतेचा समर्थक नाही, पण देशात खूप भ्रष्टाचार आहे. हे सुधारा, नाहीतर मला आंदोलन सुरू करावे लागेल असेही ते म्हणाले. 

बाबा रामदेव यांनी राजकारण्यांना आपापसात भांडण्याऐवजी राष्ट्रीय हितासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. पाकिस्तान आणि परकीय शक्तींविरुद्ध लढायचे आहे, त्यांनी आपापसात भांडू नये. द्वेष करणे योग्य नाही. देशात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचेही कौतुक केले पाहिजे, असेही ते म्हणाले.