Farming News: सेंद्रीय शेतीमुळे कृषी क्षेत्रात क्रांती; पतंजलीचा दावा, आमच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना फायदा
पतंजलीने सांगितले की, आमचे संपूर्ण लक्ष्य जैविक शेतीवर असून रासायनिक खते आणि किटकनाशकांचा कमीत कमी वापर करुन मातीच्या सुपिकता वाढविण्यास मदत करेल.

नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव (Baba ramdev) यांच्या पंतजलीने भारतीय कृषी क्षेत्रात नव्या क्रांतीची सुरुवात केल्याचा दावा पतंजली आयुर्वेदानेच केला आहे. ज्यामुळे, केवळ टिकाऊ शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टी सक्षम बनविण्यात येत नाही, तर पर्यावरणाचे रक्षण आणि शेतातील मातीच्या पीक घेण्याच्या क्षमतालाही प्राधान्य दिलं जात आहे. पतंजलीने उचलले हे पाऊल देशातील शाश्वस शेती (Farmer) उद्योगात नवी क्रांती, बदल घडवणारे आहे, असेही पतंजलीने म्हटलं आहे. पंतजलीचा (Patanjali) हा दावा परिवर्तनकारी का मानला जात आहे, याचा अभ्यास या लेखातून करता येईल. सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवून मातीची दीर्घकालीन सुपिकता टिकविण्याचा पतंजलीचा प्रयत्न आहे.
पतंजलीने सांगितले की, आमचे संपूर्ण लक्ष्य जैविक शेतीवर असून रासायनिक खते आणि किटकनाशकांचा कमीत कमी वापर करुन मातीच्या सुपिकता वाढविण्यास मदत करेल. पंतजली किसान समृद्धी उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना जैविक शेतीबाबत अत्याधुनिक तंत्रज्ञानांच्या वापराचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यामुळे, केवळ आपल्या पीकांची गुणवत्ता वाढीस लागण्यास मदत होणार नाही, उत्पादन क्षमता वाढेल आणि खर्च कमी होईल. पतंजलीचा हा उपक्रम शेतातील मातीला उबजाऊ बनवून दिर्घकाळ जमीन सुपीक बनविण्यास निश्चितच मदत करेल. ज्यामुळे, शाश्वत शेतीला चालना मिळेल, असा दावा पतंजलीकडून करण्यात येत आहे.
पतंजलीने आणखी एक दावा केला आहे, ज्यामध्ये सेंद्रीय (जैविक) उत्पादने जसं की सेंद्रीय खाद्य, सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून मातीच्या भौतिक आणि रासायनिक कार्यक्षमतेला अधिक बळकटी देते. ह्या उत्पादनात ह्युमिक अॅसिड आणि मायकोराईजा यांच्यासारख्या नैसर्गिक तत्वांचा सहभाग आहे. ज्यामुळे, पिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढते. हे केवळ पर्यावरणाच्या दृष्टीनेच अनुकूल नाही. तर, शेतकऱ्यांची रासायनिक खतांवरील अवलंबनापासून सुटका होते. त्यामुळे, शेतकऱ्यांना शेती आर्थिक रुपाने आणखी लाभदायक ठरते.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं काम - पतंजली
बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कृषी क्षेत्राबाबत दावा केलाय की, कंपनीने उचललेलं हे पाऊल ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारं आहे. योग्य व्यापार, उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा, उत्पादनांचा योग्य मोबदला मिळणार आहे. त्यामुळे, साहजिक त्यांचे उत्पादन आणि आर्थिक स्थैर्य वाढणार आहे. डिजिटल साक्षरता आणि बाजारपेठेत शेतकऱ्यांचे उत्पादन पोहोचविण्यासाठी पतंजलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम सुरू आहे. पतंजलीचे हे मॉडेल शेतकऱ्यांना केवळ व्यक्तिगत लाभ मिळवून देणार नाहीत, तर स्थानिक समाजात रोजगार वाढीस लागून आर्थिक विकासाला देखील चालना देणारं आहे.
हेही वाचा
अमित ठाकरेंना तुम्ही पाडलं हे राज ठाकरे विसरतील का? रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना अनेक सवाल


















