Ayodhya Ram Mandir CEO : अयोध्या येथील भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या व्यवस्थापनाबाबत एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टला त्यांचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मिळाले आहेत. भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा (Jitendra Mishra)  यांची या सर्वोच्च पदासाठी निवड करण्यात आली आहे.

Continues below advertisement

एअर मार्शल जितेंद्र मिश्रा हे आपल्या नियुक्तीच्या दिवसापासून पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी राम मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी सांभाळतील. ते याच वर्षी एप्रिल महिन्यात भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले होते.

Air Marshal Jitendra Mishra Profile : कारगिल युद्धातील नायक अन् 'सर्वोत्तम युद्ध सेवा मेडल'

एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय हवाई दलात तब्बल 38 वर्षे उल्लेखनिय सेवा बजावली आहे. लढाऊ विमान पायलट, कॉम्बॅट इन्स्ट्रक्टर आणि टेस्ट पायलट म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी 1999 च्या ऐतिहासिक कारगिल युद्धात तसेच 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Continues below advertisement

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्याचे रहिवासी असलेले जितेंद्र मिश्रा हे एनडीए (NDA) खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडे 3 हजार तासांपेक्षा जास्त वेळ लढाऊ विमाने उडवण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यांच्या अतुलनीय सेवेबद्दल त्यांना ‘सर्वोत्तम युद्ध सेवा मेडल’ने सन्मानित करण्यात आले आहे.

Ram Mandir CEO Selection : 5500 अर्जांमधून 18 नावांची निवड

राम मंदिराच्या सीईओ पदासाठी तब्बल 5500 हून अधिक उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यापैकी केवळ 18 जणांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या खानपान, जीवनशैली आणि हिंदू धर्माशी संबंधित विविध धार्मिक मान्यतेबाबत सखोल प्रश्न विचारून चाचणी घेण्यात आली होती.

या निवडीसाठी ट्रस्टने निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली, विष्णुकांत चतुर्वेदी आणि सुरेश हावडे यांची 3 सदस्यांची विशेष समिती स्थापन केली होती.

CEO Responsibilities Ayodhya : काय असेल जितेंद्र मिश्रा यांची जबाबदारी?

राम मंदिराच्या सीईओ पदावरील व्यक्तीवर मंदिराचे संपूर्ण प्रशासकीय, आर्थिक आणि कायदेशीर व्यवस्थापन सांभाळण्याची मुख्य जबाबदारी असेल. मंदिराची सुरक्षा, भाविकांची सोय, मंदिराचा दैनंदिन कारभार आणि आर्थिक पारदर्शकता राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

जून-जुलै महिन्यात राम मंदिरात दानाची चोरी झाल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली होती, ज्यानंतर अनिल मिश्रा आणि चंपत राय यांना ट्रस्टचा निरोप घ्यावा लागला होता. या घटनेनंतर ट्रस्टच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सर्वात आधी सीईओ पदाची गरज व्यक्त केली होती.

ही बातमी वाचा: