Ayodhya Ram Mandir Donation Row : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीचे प्रकरण (Ayodhya Ram Mandir Donation Case) सध्या देशभरात चांगलंच गाजत असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात यावरून मोठी खळबळ उडाली आहे. अशातच राम मंदिरामधीलदेणगी चोरी प्रकरणी (Ram Mandir Donation Case) दोन राजीनामे देण्यात आले असून पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आपला प्राथमिक अहवालही प्रसिद्ध केला आहे.
जेव्हा एबीपी न्यूजचे वार्ताहर विशाल पांडे यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खजिनदाराला याबाबतकाही प्रकरणी प्रश्न विचारला, तेव्हा ते अतिशय संतप्त झाले. ते केवळ संतप्तच झाले नाहीत, तर त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या हातातून माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न देखील केला आणि वार्ताहराला धक्काबुक्कीही केली. खजिनदार गोविंद देव गिरी (Govind Dev Giri) यांनी स्वतः माईक काढण्याचा प्रयत्न केला. खरं तर, एबीपी न्यूजच्या रिपोर्टरने गोविंद देव गिरी यांना विचारले की, खजिनदार म्हणून या संपूर्ण प्रकरणात त्यांची काही जबाबदारी आहे का. यानंतर, गिरींच्या समर्थकांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, खजिनदार गोविंद देव गिरी यांनास्वतःमाईकलास्पर्शकेला. जेव्हा रिपोर्टरने आक्षेप घेतला, तेव्हा समर्थक मागे हटले. त्यावर गिरी म्हणाले, "अर्थातच, ट्रस्टवरील प्रत्येकाची जबाबदारी आहे, माझ्यासकट."
Ayodhya Ram Mandir Donation Row : गोविंद देव गिरी खजिनदार पदाचा राजीनामा देणार का?
त्यानंतर गिरींना विचारण्यात आले की ते राजीनामा देतील का..? यावर खजिनदार गोविंद देव गिरी म्हणाले, "मी का देऊ? माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. खात्यात येणाऱ्या पैशांचा हिशोब ठेवणे ही माझी भूमिका आहे. हुंडी (दानपेटी) मोजण्याशी माझा पूर्वीही आणि आजही काहीही संबंध नाही." हे लक्षात घेतले पाहिजे की, राम मंदिरातील प्रसादाच्या चोरीचे प्रकरण सर्वप्रथम तेव्हा उघडकीस आले, जेव्हा समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी 'एक्स' या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट केली. यामुळे खळबळ उडाली आणि त्यावेळी तत्कालीन सरचिटणीस चंपत राय यांनी असे काहीही घडले नसल्याचे सांगितले होते. मात्र, नंतर चंपत राय यांच्यासह ट्रस्टने चोरी झाल्याचे कबूल केले आणि एका विशेष तपास पथकाची (SIT) शिफारस करण्यात आली. या प्रकरणात एसआयटीने चंपत राय आणि ट्रस्टचे सदस्य असलेले अनिल मिश्रा यांचीही चौकशी केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
