नवी दिल्ली: वृत्तपत्रावर खाद्यपदार्थ खाणं, किंवा बांधून देणं. हे चित्र सरार्स पाहायला मिळतं. पण ही गोष्ट धोकादायक असल्याचं  अन्न सुरक्षा नियामक (एफएसएसएआय)नं स्पष्ट केलं असून याविषयी लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.


अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) नं एक माहिती जारी केली आहे. यात म्हटलं आहे की, 'खाद्य पदार्थ वृत्तपत्रात बांधून देणं हे स्वास्थ्यासाठी चांगलं नाही. कितीही चांगले पदार्थ बनले असले तरीही वृत्तपत्रात बांधून दिलेलं खाणं आरोग्यास धोकादायक आहे.' दरम्यान, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी एफएसएसएआयला ही माहिती जारी करण्याचे आदेश दिले.

एफएसएसएआयकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटलं की, वृत्तपत्रावर छापण्यात आलेल्या शाईमध्ये अनेक धोकादायक बायोएक्टिव्ह तत्व असतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, एफएसएसएआयनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अन्न सुरक्षा आयुक्तांना याबाबत लोकांना जागरुक करण्याचे आदेश दिले आहे.